तात्यासाहेब मानेंना मरणोत्तर ‘समाजरत्न’
वडजाईनगरला प्रगती ट्रस्टतर्फे कर्तृत्ववानांचा पुरस्कारांनी गौरव
ढेबेवाडी, ता. २२ : वडजाईनगर (सुतारवाडी, ता. पाटण) येथील प्रगती चॅरिटेबल ट्रस्टने विविध क्षेत्रात आपल्या उत्तुंग कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्काराने गौरव केला. यावेळी मान्याचीवाडीचे पहिले आदर्श सरपंच (कै.) तात्यासाहेब माने यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याला वंदन केले.
वडजाईनगर येथील प्रगती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही ट्रस्टच्या आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उपक्रम राबविला. जनसहकार समूहाचे संस्थापक व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व मारुतीराव मोळावडे, सुमारे ३३ वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून ५८ गावांत सेवा करणारे डॉ. बबनराव पाटील, सुमारे २५ वर्षांपासून कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे शिवाजीराव मत्रे, सलग सात वर्षे उसाचे विक्रमी उत्पादन घेणारे करपेवाडी येथील प्रगतशील शेतकरी कृष्णाजी करपे यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले. २५ वर्षांपूर्वी सर्व ग्रामस्थ व युवकांना एकत्र करून आदर्श ग्रामच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवणारे मान्याचीवाडीचे पहिले आदर्श सरपंच (कै.) तात्यासाहेब माने यांना मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार प्रदान केले. त्यांच्या पत्नी मुख्याध्यापिका सुलभा माने व ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला. ट्रस्टचे संस्थापक जयवंत मोरे यांनी प्रास्ताविक केले. गुगलमध्ये नियुक्ती झालेल्या मालदन येथील वैष्णवी संजय काळे, एमबीबीएसला प्रवेश मिळविणारी शर्वरी प्रशांत मोरे, सीएची पदवी संपादन केलेल्या किरण रवींद्र साबळे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. बेटी बचाव प्रकल्पाला मदत म्हणून सहाय्यक अभियंता प्रकाश देसाई यांनी २५ हजार रुपयांची देणगी दिली. यावर्षी जन्मलेल्या दोन बालिकांना या उपक्रमांतर्गत ठेव पावत्यांचे वितरण झाले. उपप्राचार्य अधिकराव कणसे, प्रकाश देसाई आदींसह सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. मयुरी मोरे यांनी आभार मानले. ॲड. आशिष मोरे यांनी सूत्रसंचालन केले. ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी मोरे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष हणमंत मोरे यांनी स्वागत केले.
B08146
वडजाईनगर (सुतारवाडी) : पुरस्कार स्वीकारताना सुलभा तात्यासाहेब माने. समवेत ग्रामस्थ, पदाधिकारी.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.