Home 
पुणे

टीडीआरमधील चोरी थांबणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - हस्तांतर विकास हक्काच्या (टीडीआर) व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. टीडीआर खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करताना रेडीरेकनरमध्ये दर्शविण्यात आलेल्या दराच्या किती टक्के मुद्रांक शुल्क आकारावे, याचा विचार सुरू असून लवकरच तो दर निश्‍चित करून त्यानुसार आकारणी करण्यात येणार आहे. तसे झाल्यास अशा व्यवहारांमध्ये होणारी मुद्रांक शुल्काची चोरी थांबण्यास मदत होणार आहे. 

महापालिकेकडून विकास आराखड्यात दर्शविलेली विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी जागामालकास रोख रकमेऐवजी टीडीआरच्या स्वरूपात मोबदला देण्याची तरतूद कायद्यात आहे. अशा टीडीआरचे बाजारात मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात; परंतु अनेकदा मुद्रांक शुल्क कमी भरण्यासाठी दस्तामध्ये टीडीआरची किंमत कमी दर्शविली जाते. त्यातून राज्य सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडतो.

मध्यंतरी या संदर्भात राज्य सरकारकडून कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्याचा आधार घेत टीडीआरच्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारणीबाबत धोरण निश्‍चित करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. 

जमिनीचे ठिकाण व दराबाबत संभ्रम
मुद्रांक शुल्क निश्‍चित करताना ज्या ठिकाणाहून टीडीआरची निर्मिती झाली आहे, त्या ठिकाणच्या जमिनीचा रेडीरेकनरमधील दर ग्राह्य धरावा की खरेदीदार ज्या ठिकाणी तो टीडीआर वापरणार आहे, त्या ठिकाणचा रेडीरेकनरमधील दर ग्राह्य धरावा, यावर विचार सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT