chain snatching 
पुणे

चहा विक्रेत्या वृद्ध महिलेला लुटले; पाटसमध्ये दिवसाढवळ्या घडला प्रकार

अमर परदेशी

पाटस - पाटस (ता. दौंड) येथे चोरटयांनी चहाविक्रेत्या वयोवृध्द महीलेला भुरळ पाडुन तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजता घडला. व्दारकाबाई शेलार (वय ७०) रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे असे चहाविक्रेत्या वृध्द महीलेचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

याबाबत व्दारकाबाई शेलार, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे यांनी माहीती दिली. व्दारकाबाई यांचा पाटस येथील गुरुकुल शाळेच्या शेजारी चहाचा गाडा आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसम दुचाकीवरुन आले. त्यातील एकजण व्दारकाबाई यांच्याकडे येवुन आजी चहा द्या असे म्हणाला. त्यांच्याशी गप्पा मारीत मारुती मंदीर कुठे आहे याची चौकशी केली. आजीला बिस्कीट खाण्यासाठी दिले. मात्र, आजीने त्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी आजीच्या डोळ्यासमोर पाचशे रुपयांच्या नोटा धरुन आम्हाला देवाला दान करायच्या आहेत. असे म्हणत त्यांना भुरळ पाडली. क्षणात आजीच्या गळ्यातील दागीना घेवुन पोबारा केला. काही वेळानंतर व्दारकाबाई यांना गळ्यातील दागीना गेल्याचे लक्षात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांनी आरडा-ओरडा करुन परीसरातील नागरीकांना झालेल्या प्रकाराबाबत सांगितले. रुपाया-रुपाया गोळा करुन मोठया कष्टाने जपलेला दागीना गेल्याने आजींना असह्य झाले. माहीती मिळताच पाटस पोलिस चौकीचे पोलिस हवालदार बाळासाहेब पानसरे, पोलिस नाइक घनशाम चव्हाण, दशरथ कोळेकर, समिर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. आजींकडुन झालेल्या प्रकाराबाबत सर्व माहीती घेतली. परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिस चौकीत अध्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

दरम्यान, घराबाहेर, दुकानात किंवा बाहेर कुठे कोणी अज्ञात व्यक्ती काही चौकशी करीत असल्यास महीलांनी सावध राहवे. कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, दागीने दाखवू नये, असे काही आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस हवालदार बाळासाहेब पानसरे यांनी केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT