विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण
पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पाथर्डी, ता. १२ ः तालुक्यातील जवखेडे खालसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) सकाळी घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात संदीप कोंडीराम मचे या शिक्षकाविरुद्ध मुलांची काळजी व संरक्षण कायद्यातील कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्याच्या आईने फिर्याद दिली आहे.
संबंधित विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथे चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी सकाळी शिक्षकाने विद्यार्थ्याला काठीने मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या शरीरावर इजा झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकाराबाबत पालकांनी संबंधित शिक्षकाकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने विद्यार्थ्याच्या आईने हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर शनिवारी ग्रामस्थांनी शाळेत जाऊन संबंधित शिक्षकाकडे घटनेबाबत विचारणा केली, तसेच या घटनेच्या निषेधार्थ शिक्षण विभागाकडे निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
..................
कारवाईकडे लक्ष
या घटनेबाबत शिक्षण विभागाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक धोत्रे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.