Teacher Day this year district awards are yet to be announced Today teacher's day award distribution will delayed sakal
पुणे

Teacher Day : शिक्षकदिन उजाडला तरी यंदाच्या जिल्हा पुरस्कारांची घोषणा बाकी; शिक्षकदिनी वितरणाचा मुहूर्त टळणार

यंदाही याची पुनरावृत्ती झाली असून, अद्याप जिल्हा शिक्षक पुरस्कारांची यादी जाहीर झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आल्यापासून म्हणजेच मागील दोन वर्षांपासून सातत्याने जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर होण्यास मोठा विलंब होऊ लागला आहे. यामुळे दरवर्षी शिक्षकदिनी प्रदान केले जाणारे हे पुरस्कार मागील वर्षापासून शिक्षकदिन उलटून गेल्यानंतर जाहीर केले जाऊ लागले आहेत.

यंदाही याची पुनरावृत्ती झाली असून, अद्याप जिल्हा शिक्षक पुरस्कारांची यादी जाहीर झालेली नाही. यामुळे यंदाही येत्या शिक्षकदिनी (ता.५) हे पुरस्कार प्रदान करण्याचा मुहूर्त टळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा शिक्षक पुरस्कार हे दरवर्षी शिक्षकदिनापुर्वी किमान दोन दिवस आधी जाहीर करण्याची आणि शिक्षकदिनी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी हे पुरस्कार खास समारंभात प्रदान करण्याची प्रथा चालू आहे. मात्र प्रशासकराज आल्यापासून ही प्रथा खंडित झाली आहे. प्रथा खंडित होण्याचे यंदाचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी एक, याप्रमाणे तेरा तालुक्यांमधील मिळून तेरा शिक्षकांना जिल्हा शिक्षक तर, अन्य तेरा शिक्षकांना प्रोत्साहनपर शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. याशिवाय याच कार्यक्रमात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत किमान पाच किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेल्या शाळेतील शिक्षकांचा खास गौरव केला जातो.

पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २० मार्च २०२२ रोजी संपुष्टात आलेला आहे. तेव्हापासून आजतागायत जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आहे. यानुसार गेल्या वर्षी शिक्षकदिनीही प्रशासकराज होते. त्यामुळे गेल्या वर्षीचा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभही शिक्षकदिनी झाला नव्हता. यंदा त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT