indapur.
indapur. 
पुणे

शिक्षक हा राष्ट्र उभारणी करणारा महत्वाचा घटक - श्रीकांत पाटील 

डॉ. संदेश शहा

इंदापूर - शिक्षक हा राष्ट्र उभारणी करणारा महत्वाचा घटक आहे असे प्रतिपादन तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी केले. 

आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र ज्ञान मंडळ, विश्व प्रतिष्ठानच्या वतीने अल्फाबाईट सभागृहात शिक्षक दिनानिमित्त शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणा-या अकरा शिक्षकांचा सन्मानचिन्ह व पत्र देवून सत्कार करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पुजन तहसिलदार पाटील, इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्राथमिक शिक्षक सोसायटीचे माजी सभापती नानासाहेब दराडे यांच्या हस्ते झाले. 

यावेळी केंद्रप्रमुख सुनिता कदम, प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक 
बालाजी कलवले, दत्तात्रय ठोंबरे, देवानंद शेलार, धरमचंद लोढा, प्रशांत सिताप उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संजय चाकणे, शरद झोळ(राधिका माध्यमिक विद्यालय), माधवी पडतुरे(प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कुल), अनुराधा इनामदार(विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मिडियम स्कुल), बहार खान(डॉ. कदम गुरूकुल), सुप्रिया आगरखेड(श्री. नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर), प्रा.विरेशहोळकुंदे (इंदापूर कॉलेज), अश्विनी भिसे (श्रीमती कस्तुराबाई श्रीपती कदमविद्यालय)(सर्व इंदापूर), राजेंद्र जाधव(विवेकानंद विद्यालय, शिरसोडी), इशरत मोमीन(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिजवडी), शाम सातरले(कला महाविद्यालय, भिगवण) यांचा यावेळी गौरव झाला. 

तहसिलदार पाटील पुढे म्हणाले, शिक्षक जगण्याची कला तसेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन देतो.शिक्षक सामान्यातील असामान्यत्व शोधून  त्याच्यावर समाज वाचन व घडविण्याचे संस्कार करतात. स्वागत उपाध्यक्ष प्रा. तुषार रंजनकर, जेष्ठ संचालक डॉ. श्रेणीक शहा यांनी केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा तर सुत्रसंचलन सेवानिवृत्त मुख्याध्यापक किरण जाधव यांनी केले. आभार कार्याध्यक्ष, प्राचार्य भास्कर गटकुळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सचिव जमीर शेख, संचालक सुभाष पानसरे, नामदेव गानबोटे, आगतराव इंगळे यांनी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT