पुणे

पोस्ट ऑफ द मंथ पुरस्काराचे उत्साहात वितरण

CD

ASI26B01205
आष्टी (ता. मोहोळ) : गटशिक्षणाधिकारी अविचल महाडीक यांच्या हस्ते पोस्ट आफ द मंथ पुरस्काराने सन्मानित शिक्षक.
---
पोस्ट ऑफ द मंथ पुरस्काराचे वितरण
आष्टी : जिल्हा परिषद सोलापूर व ओपन लिंक्स फाउंडेशन (विनोबा ॲप पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांच्या मोहोळ तालुकास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्काराचे वितरण गटशिक्षणाधिकारी अविचल महाडीक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्य विकासासाठी विनोबा ॲपच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. प्रोत्साहन म्हणून कृतिशील, उपक्रमशील शिक्षकांना दरमहा सन्मानित केले जाते. त्यांच्या उपक्रमांची उपयुक्तता व मिळालेले लाइक्स यांच्या एकत्रीकरणातून केंद्र, तालुका, जिल्हा स्तरावर गुणांकन केले जाते व पुरस्कार घोषित केले जातात. निर्मला रोकडे, प्रदीप माळी (ऑक्टोबर), शगुप्ता शेख, महेमूद अहमद अन्सारी (नोव्हेंबर), रवींद्र देबडवार, निर्मला केदारलिंगे (डिसेंबर) व सीमा स्वामी, रामेश्वरी सुतार (जानेवारी) या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ओपन लिंक्स फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक वसीम शेख, केंद्रप्रमुख रूपेश क्षीरसागर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

Ferry Boat: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू, प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील नियुक्त्या अवैध; पगार वसुलीचे निर्देश, फाइल, आदेश नसलेल्या शिक्षकांवर कारवाई

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! १० हजार स्वयंसेवक आणि होमगार्ड्स सांभाळणार भाविकांच्या सुरक्षेची धुरा

SCROLL FOR NEXT