Online Paper
Online Paper 
पुणे

कला शिक्षक संघटना आक्रमक; ऑनलाइन पेपरला विरोध

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कला संचालनालयाने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांचे पेपर ऑनलाइन पाठविण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याविरोधात राज्यभरातून कला शिक्षक संघटनेकडून निषेध केला जाऊ लागला आहे. निर्णय रद्द केला नाही, तर संचालनालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे.

येत्या २७ तारखेपासून या परीक्षा सुरू होत आहे. अमरावती जिल्हा कलाध्यापक संघाने या निर्णयाला जाहीर विरोध करताना म्हटले आहे, की ग्रामीण व आदिवासी, डोंगरी भागातसुद्धा केंद्र आहेत. सर्वच शाळा डिजिटल नाहीत. फक्त स्वतःच्या परिसराचा विचार करू नये. ग्रामीण भागात झेरॉक्‍स मशिन नाहीत. डोंगरी भागात नेट चालत नाही. प्रश्नपत्रिका डाऊनलोड होणार नाहीत. अनेक समस्या निर्माण होतील.

शिरूर तालुका कलाध्यापक संघाने ऑनलाइन प्रश्नपत्रिकांना विरोध दर्शविला आहे. शासकीय ग्रेड परीक्षेचा कंटाळा आला असेल तर या परीक्षा ऑनलाइन होऊ शकणार नाही. कारण, ग्रामीण भागातील विद्युत यंत्रणाचा, परिसराचा विचार करावा. ग्रामीण भागातील मुले या परीक्षेला कसे प्रविष्ट होतात, हे तेथील कलाशिक्षकच सांगू शकेल. त्यामुळे या परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात, अशी मागणी या संघटनेने केली आहे.

अनेक परीक्षा केंद्रांवर दीड ते दोन हजार मुले एकावेळी परीक्षा देणार आहेत. प्रश्नपत्रिका तासभर आधी आली, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात झेरॉक्‍स कशा काढायच्या आणि त्या कधी वाटायच्या, यात शिक्षक आणि मुलांची तारांबळ उडेल, अशी चिंता शिक्षक सचिन भोंगाडे यांनी व्यक्‍त केली. पुणे जिल्हा कला शिक्षक संघटनेने हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. निर्णयापूर्वी परीक्षा प्रक्रियेत प्रश्‍न निर्माण होण्याचा विचार करायला हवा होता. तसेच कला शिक्षक संघटनेला विचारत न घेता हा निर्णय घेतल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT