पुणे

पवित्र पोर्टलवर ३०,२०९ शिक्षक भरती

CD

पवित्र पोर्टलवर ३०२०९ शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू
--
पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याचे आवाहन
--

बुलडाणा : राज्यातील शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला असून पवित्र पोर्टलद्वारे ३० हजार २०९ शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी ६ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पोर्टलवर लॉगिन करून पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या १४३२०, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या १००१२, इयत्ता ९ वी ते १० वीच्या ५५१३ आणि इयत्ता ११ वी ते १२ वीच्या ३६४ अशा एकूण ३०२०९ पदांचा समावेश आहे. या पदांमध्ये शासकीय शाळा, शासकीय विद्यानिकेतन, खासगी शैक्षणिक संस्था, नगर परिषद, महानगरपालिका तसेच आदिवासी विकास विभागातील रिक्त जागांचाही समावेश आहे.
यामध्ये नगर परिषदांच्या २८०, महानगरपालिकांच्या १,९५४ आणि आदिवासी विकास विभागाच्या २,४२१ पदांचा समावेश आहे.
उमेदवारांना पसंतीक्रम नोंदविण्याबाबत एसएमएसद्वारेही सूचना पाठविण्यात येत आहेत. दिलेल्या मुदतीत पसंतीक्रम लॉक करणे अनिवार्य असून, त्यानंतर गुणवत्ता यादीच्या आधारे मुलाखतीशिवाय नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेसंदर्भातील सूचना किंवा तक्रारी उमेदवारांनी ई-मेलद्वारे पाठवाव्यात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

लाज वाटत नाही?... जुई गडकरीचा डीपफेक VIDEO व्हायरल; सुपरस्टार मराठी कपलच्या मुलासोबत जोडलं नातं, कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT