teacher recruitment stalled aptitude test stalled tet scam pune
teacher recruitment stalled aptitude test stalled tet scam pune  Sakal
पुणे

पुणे : शिक्षकभरतीची अभियोग्यता परीक्षा रखडली

सम्राट कदम

पुणे : राज्यात शिक्षकभरती पवित्र पोर्टलमार्फत घेण्याचा निर्णय २०१७ मध्ये करण्यात आला होता. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यातच पहिल्यांदा शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता परीक्षाही घेण्यात आली. मात्र त्यानंतर चार वर्षे उलटून गेली तरीही शासनाकडून पुढची अभियोग्यता परीक्षा घेण्यात आलेली नाही. नुकतेच उघड झालेले टीईटी पेपरफुटी प्रकरण आणि रखडलेली परीक्षा यामुळे उमेदवार हवालदिल झाले आहेत.

शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२१ मध्ये फेब्रुवारीतच अभियोग्यता परीक्षा घेण्याबाबत पत्राद्वारे सूचना केली होती. मात्र, टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे फेब्रुवारीचा मुहूर्त टळला. या बद्दल उमेदवार मोहम्मद शेख म्हणाले,‘‘पेपरफुटी प्रकरणामुळे आतापर्यंत टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. आता एप्रिलमध्ये दुसरी अभियोग्यता परीक्षा घेण्यात येणार असल्याची सूचना फेब्रुवारीमध्ये उमेदवारांना पवित्र पोर्टलवरच देण्यात आली होती. परंतु अद्याप त्याबाबत कोणतीही जाहिरात काढण्यात आलेली नाही. म्हणून आता एप्रिलमध्ये परीक्षा घेणे शक्य आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.’’ राज्यातील लाखो पात्र उमेदवार परीक्षेच्या प्रतिक्षेत असून, वारंवार परीक्षा पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. या रखडलेल्या अभियोग्यता परीक्षेसंदर्भात शिक्षण आयुक्तांची भेट घेण्यात आल्याचे एमपीएससी समन्वय समितीचे राज्य संघटक सुरेश सावळे यांनी सांगितले आहे.

अभियोग्यता चाचणी...

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (टीईटी) झाल्यानंतर घेण्यात येणारी दुसरी चाचणी म्हणजे ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता’ परीक्षा होय. या चाचणीतील गुणांच्या आधारे आता भरती केली जाणार आहे. डिसेंबर २०१७ मधील पहिल्याच अभियोग्यता परीक्षेत पावणेदोन लाखांपेक्षा अधिक डीएड, बीएडधारक उमेदवार पात्र झाले होते. भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

राज्यात प्रथमच २०१७ मध्ये 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत परीक्षा झालीच नाही, म्हणून नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रकही तातडीने जाहीर करावे.

- शुभम तिडके, उमेदवार

टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये या आधीच्या परीक्षा एजन्सी आणि संबंधितांचा सहभाग आहे का नाही, याची चौकशी चालू आहे. संपूर्ण तपासानंतरच आलेल्या तथ्यांच्या आधारे परीक्षेसंदर्भातील पुढचा निर्णय घेण्यात येईल.

- सुरज मांढरे, राज्याचे शिक्षण आयुक्त

टीईटी उत्तीर्ण झालेले उमेदवार

वर्ष : पेपर १ - पेपर २ - एकूण

१)२०१४-२५६३-७०३२-९५९५

२) २०१५ - १९०३-७०८६-८९८९

३) २०१७- ७४४५- २९२८-१०३७३

४) २०१८ - ४०३०-५६४७-९६७७

५) २०२०-१०४८७-६१०५-१६५९२

(२०१६,२०१९ ला परीक्षा झाली नाही)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT