High-Court-Mumbai
High-Court-Mumbai 
पुणे

शिक्षक बदल्याप्रकरणी झेडपीला हायकोर्टाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
पुणे - जिल्ह्यातील पेसा (आदिवासी भागातील शाळा) क्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षकांच्या घाईने अन्य शाळांमध्ये बदल्या केल्याप्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार पुढील आदेश होईपर्यंत "जैसे थे' स्थिती ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हा परिषदेला दिला आहे. यामुळे अचानक बदली झालेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या आदेशामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची मोठी नाचक्की झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 25 सप्टेंबरला ठेवण्यात आली असून, याबाबत खुलासा करण्याचा आदेशही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात काम करणाऱ्या 52 शिक्षकांची केवळ एकाच दिवसात बदली करण्यात आली होती. यासाठी राज्य सरकारच्या 11 सप्टेंबरच्या पत्राचा आधार घेण्यात आला होता. परंतु, शिक्षक बदल्यांबाबत 27 फेब्रुवारी 2017 मधील अध्यादेशातील तरतुदींना डावलण्यात आले होते. याबाबत शिक्षकांनी हरकतीही घेतल्या होत्या. पण, शिक्षण विभागाने त्यांची दखल घेतली नाही, या सर्व बाबी न्यायालयाने विचारात घेत, हा अंतरिम आदेश दिल्याचे याचिकाकर्त्या शिक्षकांचे वकील शंकर काटकर यांनी सांगितले.

याप्रकरणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय वाळूंज यांच्यासह सात जणांनी आव्हान याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी हा आदेश दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT