पुणे

आकुर्डी येथील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी (पुणे)- कुठल्याही क्षेत्रात जा, सक्षम बना, आपल्या स्वतःच्या क्षेत्रात एक अढळ स्थान निर्माण करा असे प्रतिपादन प्राचार्य मनोहर चासकर यांनी आकुर्डीत केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी, चासकर बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन तृतीय वर्षा व पदवीत्तर वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले होते.

पुढे बोलताना चासकर म्हणाले की, आपल्या कर्तृत्वाचा ठसा न राहता त्याची मोहोर व्हावी व विद्यार्थ्यांनी आपले कसब दाखवून एक सज्जग नागरिक बनावा यावेळी वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. बाजीराव शिंदे, प्रा. राजेश नांगरे, डॉ. प्रतिमा कदम, डॉ.वर्षा श्रीराम, प्रा. किशोर सस्ते, डॉ. प्रीती जोगी प्रा. सिद्धराम मठ व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षकांविषयी असणारा आदर व गुरुप्रती असणारी भावना हे व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 5 सप्टेंबर. शिक्षक आपणाला विविध प्रकारे घडवत असतात त्याच्याप्रती असणारी भावना व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच असते. अशा शब्दांत वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. राजेश नांगरे यांनी मत व्यक्त केले.या कार्यक्रमात कोमल समगिरे, कोमल पिसाळ, गुणवंती,येलकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

तसेच, सर्व प्राध्यापकांचे बहुमुल्य असे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक कारळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदवीत्तर वनस्पती शास्त्राच्या ऐश्वर्या टोणगे, हर्षल टिळेकर, निकिता बालसराफ, विशाल सणस या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT