पुणे

जुन्या पेन्शन बातमी

CD

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक आक्रमक

काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात ः पाच सप्टेंबरला धरणे आंदोलन
अहिल्यानगर, ता. ३ ः जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. मंगळवारपासून (ता. एक) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यास सुरुवात केली आहे. एक ते चार सप्टेंबर या कालावधीत काळ्या फिती बांधून नियमित शैक्षणिक कामकाज सुरू ठेवत हे आंदोलन करण्यात येणार आहे.

यानंतर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर सहकुटुंब आंदोलन छेडण्यात येईल, तसेच आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे आणि राज्य समन्वयक सुनील भोर यांनी ही माहिती दिली. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी विविध आंदोलने, निवेदने आणि मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही शासनाकडून या प्रश्‍नावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असा आरोप जुन्या पेन्शन योजना समन्वय संघाने केला आहे. त्यामुळे आता आंदोलनाचा टप्पा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Egg Freezing & Future Fertility: आई-वडिल होण्यासाठी अंडी फ्रीज करण्याचा विचार करताय? आधी ‘या’ ४ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT