जुनी पेन्शनसह शिक्षकांच्या
प्रश्नांवर भुसे यांचे आश्वासन
शिक्षक आमदारांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : जुनी पेन्शन योजना, सेवक संचातील त्रुटी, वेतनेतर अनुदान, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता व शालार्थ तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यभाराच्या प्रश्नांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत सोमवारी (ता. ७) मुंबई येथे बैठक झाली. यावेळी काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. ‘सगळेच प्रश्न एकदम सुटणार नाहीत; मात्र टप्प्या- टप्प्याने एक-एक प्रश्न सोडविण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू,’ असे भुसे यांनी सांगितले.
मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोषाध्यक्ष संदेश राऊत, मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, राहुल पवार, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, विक्रम काळे, प्रताप सरनाईक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त; मात्र त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल विचारात घेऊन या प्रश्नावर कार्यवाही करण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.
डोंगरी भागातील सेवक संचासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी, शिक्षकांना शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय इतर विभागांकडून अशैक्षणिक कामे देऊ नयेत, मार्च २००८ नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे व त्याची टक्केवारी वाढवावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.
शासन निर्णयापूर्वी जाहिरात देऊन भरती झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता व शालार्थ द्यावा, वर्ग चार कर्मचाऱ्यांची पदे पूर्वीप्रमाणे वेतनश्रेणीत भरण्यास परवानगी द्यावी, अतिरिक्त नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करून ते नियमितपणे द्यावे, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २० व ३० वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.