पुणे

शिक्षकांना आता ठेवावे लागणार नाही ‘फाईलवर वजन’

CD

सकाळ एक्सक्ल्युझिव्ह

शिक्षकांना आता ठेवावे लागणार नाही ‘फाईलवर वजन’
वैयक्तिक मान्यतेसाठी आता स्वतंत्र पोर्टल; शाळांना ऑनलाइन प्रस्तावाचे बंधन

तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतांचे प्रस्ताव आता शाळांना ऑनलाइन पाठवावे लागणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे शाळांना कागदी फाइल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याचा प्रकार कायमचा बंद होईल. या पार्श्वभूमीवर कागदी फाइल पुढे सरकण्यासाठी कोणत्याही टेबलावर ‘वजन’ ठेवावे लागणार नाही.
खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील अनेक शिक्षकांकडे बनावट शालार्थ आयडी आढळले. याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. समिती डिसेंबरअखेर चौकशी अहवाल सरकारला देणार आहे. तत्पूर्वी, शिक्षण विभागाने १८ नोव्हेंबर २०१२ ते ७ जुलै २०२५ या काळातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाइन मागवून घेतली आहेत. दुसरीकडे, १८ नोव्हेंबर २०१६ ते ७ जुलै २०२५ या काळातील वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश, खासगी व्यवस्थापनाच्या नियुक्तीचे आदेश व कर्मचारी रुजू अहवाल अशी कागदपत्रे देखील मागविली. यात आवक-जावक नोंद नसतानाही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यता आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात असे गंभीर प्रकार होऊ नयेत, पैसे दिल्याशिवाय शिक्षण विभागात काम होत नाही, त्यासाठी फाइल अडवून ठेवली जाते, अशा तक्रारी कायमच्या बंद व्हाव्यात म्हणून शालेय शिक्षण विभागाने वैयक्तिक मान्यतेचे नवे पोर्टल तयार केले आहे.

कोट :
आता शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी शिक्षण विभागातील कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागणार नाहीत. शाळा थेट मुख्याध्यापकांच्या माध्यमातून वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव ऑनलाइन पाठवतील. तो प्रस्ताव कोणत्या अधिकाऱ्यांकडे किती दिवस प्रलंबित आहे, याची माहिती वरिष्ठांना समजणार आहे. त्यामुळे मुदतीत सर्व कामे होतील. त्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे.
- डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक शिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT