teachers recruitment of 21 thousand 678 advertisement publish Sakal
पुणे

Teachers Recruitment : राज्यात अखेर शिक्षकांच्या २१ हजार ६७८ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार, अखेर मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे.

- मीनाक्षी गुरव

पुणे : राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार, अखेर मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेतली होती.

या चाचणीसाठी एकूण दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. या चाचणीमधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीसाठी शिक्षण सेवक, शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यम, बिंदुनामावली, विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांचा एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. सोशल मिडियावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव,

खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयावरील धोरणाचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षक भरतीच्या एकूण जागा जाहीर झाल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी जवळपास सात हजारांहून अधिक उमेदवारांनी प्राधान्यक्रम देखील दिला आहे.

ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यावर तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे, असेही मांढरे यांनी सांगितले.

शिक्षक भरतीच्या रिक्त जागांचा तपशील

संस्था: संस्थांची संख्या : शिक्षकांची रिक्त पदे

जिल्हा परिषद : ३४ : १२,५२२

महानगरपालिका : १८ : २,९५१

नगरपालिका : ८२ : ४७७

खासगी शैक्षणिक संस्था : १,१२३ : ५,७२८

शिक्षक भरतीच्या रिक्त जागांचा तपशील

गटनिहाय रिक्त पदे:

इयत्ता : शिक्षकांची रिक्त पदे

इयत्ता पहिली ते पाचवी : १०,२४०

इयत्ता सहावी ते आठवी : ८,१२७

इयत्ता नववी ते दहावी : २,१७६

इयत्ता अकरावी ते बारावी : १,१३५

माध्यमनिहाय रिक्त पदे

माध्यम : रिक्त पदे

मराठी : १८,३७३

इंग्रजी : ९३१

उर्दू : १,८५०

हिंदी : ४१०

गुजराथी : १२

कन्नड : ८८

तमीळ : ०८

बंगाली : ०४

तेलगू : ०२

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

- प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि ‘युजर मॅन्युअल  दिले आहे.

- उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी संकेतस्थळ : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in

- उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम लॉक करण्यासाठी कालावधी : ८ आणि ९ फेब्रुवारी

- प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल

- पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी ‘edupavitra2022@gmail.com’ या ईमेलवर पत्रव्यवहार करावा.

शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील आकडेवारी

- प्रमाणित अर्ज : १,६३,०५८

- प्राधान्यक्रम दिलेले : ७,८७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT