पुणे

शिकवणी घेणाऱ्या महिला वळल्या इतर व्यवसायांकडे

समाधान काटे

पुणे -  सध्या विद्यार्थी आॕनलाईन शिक्षण घेत असताना, घरगुती खाजगी क्लास घेणाऱ्यांचे वांदे झाले आहेत. कोरोनाच्या आगोदर घरगुती खाजगी शिकवणी घेणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त होते.या महिलांचा उदरनिर्वाह, घरखर्च  शिकवणीतून भागात असे. मात्र कोरोना आल्यापासून शिकवणी बंद झाली आहे. या महिलांकडे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थ्यां मोठ्या संस्थेत आॕनलाईन शिक्षण घेऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांना काही प्रश्र्न असतील तर ते आॕनलाईन शिकवणीत मार्गी लागत नसल्याने पालक खंत व्यक्त करतात. शिकवणी बंद झाल्याने शिक्षक इतर व्यवसायाकडे वळले आहेत.यामध्ये पापड तयार करणे,चित्रकला,खेळणी तयार करणे,केक बनवून विकणे,वाळवण तयार करणे,मास्क बनवणे असे नवीन व्यवसाय सुरू केले आहेत.छंद म्हणून शिकवणी घेणाऱ्या महिलांचा वेळ पुर्वी सत्कर्णी लागत असे, लॉकडाऊनमध्ये टिव्ही किंवा मोबाईल सुरवातीला मनोरंजनाचे साधन होते.नंतर या साधनांचा कंटाळा येऊन विद्यार्थी प्रिय वाटू लागले.शाळा व खाजगी शिकवणी कधी चालू करतील याची खाजगी शिक्षण वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"मागील तीस वर्षांपासून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना घरातून शिकवत होते.विद्यार्थी असल्याने दिवसभर वेळ कसा जायचा हे देखील कळत नव्हतं.शिकवणी बंद असल्याने पर्स विकण्याचं काम सुरू केलं आहे.सरकारने शाळा शिकवणी सुरू कराव्यात".
- वर्षा विवेक अर्जुनवाडकर. अलकापुरी हौसिंग सोसायटी वनाज कॉर्नर कोथरूड.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"ज्या प्रमाणे एक नोव्हेंबरपासून उद्याने सुरू केलीत. त्याप्रमाणे खाजगी शिकवणी व शाळा सुरू कराव्यात.शिकवणी बंद असल्याने वेळ जात नाही.मुलं असली की मन रमून जातं.
- मधु वासुदेव गुरूनानी गुजरात कॉलनी कोथरूड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT