A team of Pune Rural Local Crime Branch has nabbed an illegal village pistol holder at Patas..jpg 
पुणे

पाटस येथे बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताच्या मुसक्या आवळल्या

अमर परदेशी

पाटस : पाटस (ता.दौंड) येथे बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांच्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांगल्या मुसक्या आवळल्या. संबंधित  व्यक्तीकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी लक्ष्मण दत्तात्रय सपकाळ (वय ३५) रा.कानगाव, ता.दौंड, जि.पुणे याला अटक करण्यात आली, अशी माहीती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी नव्याने पदभार स्विकारलेले पोलिस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यावेळी पाटस येथील उड्डाणपुलाशेजारी एक व्यक्ती कमरेला गावठी पिस्तूल लावून पल्सर मोटारसायकलवर (एमएच४२ एएल११३९) फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. काही वेळातच पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली.

सदर वर्णनाप्रमाणे व्यक्तीचा शोध घेतला. त्यावेळी बसस्थानक परिसरात एक व्यक्ती संशयास्पद दिसून  आला. पोलिसांना पाहून त्याने पळ काढण्यास सुरुवात केली. मात्र पोलिस पथकाने मोठया शिताफिने आरोपी लक्ष्मण सपकाळ यास पकडले. यावेळी त्यांच्याकडे बेकादेशीर एक गावठी पिस्तूल, दोन काडतुसे दिसून आली. पोलिसांनी सदर पिस्तूल, काडतुसे, मोबाइल, मोटारसायकल असा १ लाख १८ हजार सहाशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

दरम्यान, आरोपी लक्ष्मण सपकाळ याने गावठी पिस्तूल दिपक पासलकर यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. दिपक हा रेकाॅडवरील सराइत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी सपकाळ यास पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने सदर पिस्तूल कोणत्या कारणासाठी आणले. यामध्ये आणखी कितीजण सहभागी आहेत. या हत्याराचा वापर कुठे केला आहे का? याबाबत अधिक तपास यवत पोलिस तपास करीत आहे.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे पथकाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पुथ्वीराज ताटे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, विदयाधर निचित, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजापुरे यांनी ही कारवाई केली. दौंड न्यायालयात हजर केले असता आरोपी सपकाळ यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहीती पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

पाकिस्तानचे प्रेक्षकही पलटले! संघ हरतोय दिसताच हिरव्या जर्सीवर चढवली टीम इंडियाची जर्सी; Viral Video

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

...अन् आईचे अश्रू बदलले आनंदाश्रूत, नऊ महिन्यांच्या बाळाने गिळलेली सेफ्टी पिन डॉक्टरांनी काढली बाहेर

SCROLL FOR NEXT