पुणे

मैत्री करून अत्याचार करणाऱ्यावर तरुणावर गुन्हा

CD

मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्यावर तरुणावर गुन्हा

जून २०२२ पासून प्रकार; पीडितेची सदर बझार पोलिसांत फिर्याद
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २७ : मोबाईलवर वारंवार बोलून, मेसेज करून ओळखीच्या तरुणाने १५ वर्षीय मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर ती अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेने सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. यावरून मोदी परिसरातील सिद्धार्थ किडगिरी (वय २१) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली आहे.
मैत्रीतून प्रेम असल्याचे सांगून सिद्धार्थने जून २०२२ मध्ये प्रेमसंंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये सात रस्त्यावरील सिरॉक ज्युस सेंटरमध्ये बोलावून शितपेयात गुंगीचे औषध टाकले. तेथून दुचाकीवर बसवून सोरेगाव येथील एका खोलीत नेऊन अत्याचार केले. त्यावेळी त्याने ‘तू आपल्यात जे काही झाले ते कोणालाही सांगू नको, नाहीतर तुला व तुझ्या बहिणींना, आई-वडिलांना सोडणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच ‘मी ज्यावेळी बोलावेल त्यावेळी तु माझ्यासोबत यायला पाहिजे, नाहीतर तुझी व घरच्यांची बदनामी करेन’ असेही तो म्हणाला होता. त्याने पुन्हा जानेवारी २०२६ मध्ये सोरेगावच्या ठिकाणी नेऊन पुन्हा इच्छेविरूद्ध अत्याचार केले. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याला सप्टेंबर २०२६ मध्ये माझ्याशी बोलू नको, फोन, मेसेज करू नकोस असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तरीपण, त्याने वारंवार कॉल करून त्रास दिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनेश कुलकर्णी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

Emergency Alert: ब्रिटन, अमेरिकेनंतर जपानही अलर्ट मोडवर! घरात ३ दिवसांचा अन्न-पाण्याचा साठा करा; नेमका धोका काय?

UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १२७ पदांसाठी 'या' दिवशी होणार परीक्षा

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : श्रीमंत सरदार वाघ घराण्याच्या बोधचिन्हाचे आसले येथे उत्साहात अनावरण; दरवर्षी मेळावा घेण्याचा संकल्प

SCROLL FOR NEXT