सकाळ न्यूज नेटवर्क
हैदराबाद, ता. ११ : तेलंगण सरकारने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार एकात्मिक फूल व भाजीपाला बाजारपेठ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील मोइनाबाद मंडलमध्ये त्यासाठी ३९.०७ एकर जमीन देण्यात आली आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
सुमारे २०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात शीतगृह, बहुमजली इमारती, नियोजित व्यापार व्यासपीठ, प्रशस्त वाहनतळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. शमशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच आउटर रिंग रोडजवळ हा बाजार असल्याने विविध जिल्ह्यांतून मालाची वाहतूक सुलभ होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीच्या नव्या संधी निर्माण होतील.
सध्या बंगळूरमधील कृष्णराजेंद्र मार्केट हे देशातील सर्वांत मोठ्या फूल बाजारांपैकी एक मानले जाते. मात्र, त्यापेक्षाही भव्य बाजारपेठ उभारण्याची तयारी तेलंगण सरकारने केली आहे. सध्या हैदराबादमधील गुडीमलकापूर बाजारात भाजीपाला आणि फुलांची विक्री होते. तेलंगणात प्रथमच स्वतंत्र फूल बाजारपेठ उभारली जाणार आहे.
तेलंगणातील लागवड
४,४०२ एकर
फुले
१.०३ लाख एकर
भाजीपाला
६० टक्के
हैदराबादलगतच्या जिल्ह्यांत उत्पादन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.