Telehealths is what the country needs now said Dr Madhuri Kanitkar 
पुणे

'टेलीहेल्थ' आता देशाची गरज : डॉ. माधुरी कानिटकर

सकाळवृत्तसेवा

पुणे : देशातील आजारांचे बदलते स्वरूप आणि उपचारांची व्यापकता लक्षात घेता. 'टेलीहेल्थ' देशाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (आरोग्य) लेफ्टनन जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.

राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस) च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 'आरोग्यातील संशोधन : आव्हाने आणि संधी' या विषयावर एनसीसीच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. कानेटकर म्हणाल्या,"ज्याप्रमाणे देवाला सर्वांपर्यंत पोहोचता येत नाही, त्यासाठी त्याने आईची निर्मिती केली आहे. तसेच डॉक्टरांना ज्या ठिकाणी पोहोचता येणार नाही तेथे डिजिटल माध्यमातील टॅली हेल्थ पोहोचेल." कोरोनाच्या काळात डिजिटल आरोग्य आणि उपचाराचे वाढते स्वरूप आणि भविष्यातील आव्हाने याबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कौशल्याचा अभाव :
जीवनशैलीशी निगडीत म्हणजेच हृदय, फुप्फुसे, यकृत आदींची निगडित हजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्याशी निगडित संशोधन, निदान, उपचार पद्धतींवर जास्त भर देणे आवश्यक आहे. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता कृत्रिम बुद्धिमत्ता, माहितीचे पृथक्करण आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित संशोधने आपण 7 ते 8 पटीने चांगले करू शकतो. आपल्याकडे माहिती आणि ज्ञान आहे. परंतु कौशल्याचा अभाव आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी शिक्षण, संशोधन आणि आरोग्य संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक : 
देशासमोरील समस्यांना तोंड देण्यासाठी संशोधनातील परस्पर सहकार्य वाढवायला हवे. त्यासाठी विविध शहरांत माहिती आणि तंत्रज्ञान समूहाची (क्लस्टर)निर्मिती केली जात आहे. पुण्यातही असा समूह विकसित होत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही सहकार्य वाढवायला हवे.

'नेचर' आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्देशांक :
देश : सहकार्य (टक्के)
अमेरिका : ६१.८
इंग्लंड : ५३.५
चीन : ४८.४
भारत : ३९.०

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ChatGPT Down : चॅटजीबीटी पुन्हा ठप्प, जगभरातील लाखो युजर्सचा खोळंबा; OpenAI ने सांगितले कारण

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Khadakwasla Dam : ‘खडकवासल्या’त सर्वोच्च पाणीसाठा, तेरा वर्षांतील उच्चांकी; धरणक्षेत्रात पावसाचा दिलासादायक परिणाम

Viral Video: रशियन महिलेने प्राणी संग्रहालयात नको ते कृत्य केलं... पाहणारे ही संतापले, व्हिडिओ व्हायरल

UPSC 2024 : ‘यूपीएससी’तील यशस्वितांचा गौरव; प्रशासकीय सेवेत आवड महत्त्वाची : माजी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर

SCROLL FOR NEXT