Vijay-Stambh
Vijay-Stambh 
पुणे

विजयस्तंभ अभिवादनाचे दूरदर्शनवरून प्रसारण

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात नागरिकांनी गर्दी टाळावी. नागरिकांच्या सोयीसाठी या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने देसाई यांनी सोमवारी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘‘मार्च २०२०पासून आपण कोरोना विषाणूचा सामना करीत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी, कार्तिकी वारी, चैत्री यात्रा, दसरा, दिवाळी यांसारखे सर्व सण-समारंभ आपण गर्दी न करता साधेपणाने साजरे केले आहेत. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम देखील प्रशासनाच्या नियमांचे पालन करून साजरा करावा.’’

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अभिवादन कार्यक्रमासाठी गर्दी करू नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्‍यक माहिती नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी त्यांच्याशी संवाद ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या.

देशमुख यांनी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT