The temple of Ranjangaon Mahaganapati at Shirur has been opened.jpg
The temple of Ranjangaon Mahaganapati at Shirur has been opened.jpg 
पुणे

अष्टविनायक महागणपतीचे मंदिर दर्शनासाठी खुले

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपतीचे १७ मार्चपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेले मंदिर तब्बल आठ  महिन्यांनी आज दर्शनासाठी खुले झाल्याने ग्रामस्थ, प्रवासी व भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार महागणपतीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिर बंद असल्याने परिसरातील दुकानदार आर्थिक संकटात सापडले होते. आज दिवाळी पाडवा व भाऊबीज या सणाच्या मुहूर्तावर मंदिर खुले केल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे. महागणपतीचे मंदिर पुणे- अहमदनगर रस्त्यावर येत असल्याने हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येथे थांबतात.

श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थानतर्फे दर्शनास येणाऱ्या नागरिकांसाठी नियम तयार करण्यात आले असून, दर्शनास येणाऱ्या नागरीकांची मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच थर्मल तपासणी व सॅनिटायझर करण्यात येत आहे. ट्रस्टतर्फे नागरिकांच्या दर्शनासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत आहे.

आज रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी मंदिर परिसराची पाहणी करून, विविध सुविधांची माहिती घेतली. सर्वांनी नियमांचे पालन करून महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री राऊत यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT