पुणे

मंदिरांच्या दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला; निघोज परिसरात तीन मंदिरांत चोरी.

CD

तीन मंदिरातील दानपेट्या फोडल्या
निघोज, ता. २० : निघोज परिसरातील तीन मंदिरांमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी दानपेट्या फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. वडगाव गुंड येथील भैरवनाथ मंदिर, टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील मळगंगा मंदिर आणि निघोज (कुंड) येथील मळगंगा मंदिरात चोरी झाली.
वडगाव गुंड येथील मंदिरातील दानपेटीतून किती रक्कम चोरीला गेली, याचा निश्चित आकडा सांगता येत नाही. त्यानंतर कुकडी नदी तीरावरील टाकळी हाजी येथील मळगंगा मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली. ही रक्कम अनेक दिवसांपासून काढण्यात आली नसल्याने त्यामध्ये जास्त रक्कम असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रांजणखळगे (कुंड) येथील मळगंगा मंदिरातील सीसीटीव्हीत पाच चोरटे कैद झाले आहेत. त्यांनी मंदिरात झोपलेल्या अतुल उद्धव कारकूड यांना उठवून किल्ली मागितली. किल्ली नसल्याचे सांगताच त्यांना धमकावून चोरट्यांनी गाभाऱ्याचा दरवाजा तोडून दानपेटी फोडली. दोन दानपेट्यांमधील रोकड लंपास करण्याचा प्रयत्न झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक खेडकर यांनी पाहणी केली. श्वानपथकाने कमानीपर्यंत माग काढला असून ठसे तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे. पुढील तपास पारनेर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT