पुणे

शिरूर, पारनेरमधील मंदिरे चोरट्यांच्या रडावर

CD

टाकळी हाजी, ता. २० :  शिरूर व पारनेर तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन मंदिरांना लक्ष्य करत पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. टाकळी हाजी, वडगाव गुंड व निघोज येथील मंदिरांच्या दानपेट्या फोडून रोकड लंपास केली. गुरुवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
टाकळी हाजी येथील मळगंगा देवी मंदिराचे पुजारी रामदास किऱ्हे हे गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास मंदिरात आले असता, त्यांना दानपेटी फोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अनेक दिवसांपासून दानपेटी उघडली नसल्याने मोठी रक्कम चोरीला गेल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास प्रथम पारनेर तालुक्यातील वडगाव गुंड येथील भैरवनाथ मंदिराला लक्ष्य केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा टाकळी हाजीकडे वळवला आणि अखेरीस निघोज येथील मळगंगा मंदिरात चोरी केली.
निघोज येथील मंदिराच्या मंडपात झोपलेल्या अतुल कारकुड यांना चोरट्यांनी जागे करून मंदिराची चावी मागितली. चावी नसल्याचे सांगताच त्यांची झडती घेऊन त्यांना धमकावण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी गाभाऱ्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतील चारपैकी दोन दानपेट्या फोडून त्यांनी रोकड लंपास केली, तर उर्वरित दोन दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. शिरूर व पारनेर पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. या टोळीच्या मुसक्या पोलिस कधी आवळणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

निघोजमधील घटना ‘सीसीटीव्ही’त कैद
निघोज येथील चोरीची संपूर्ण घटना ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यात पाच चोरटे स्पष्ट दिसत असून, ते सुमारे एक तास मंदिरात होते. यापूर्वीही या मंदिरांमध्ये दोन वेळा दानपेट्या फोडण्याचे प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT