Pune_Temple 
पुणे

बंद म्हणजे बंद; पुण्यातील 'ही' मंदिरे 30 जूनपर्यंत राहणार बंद!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सारसबाग सिद्धिविनायक मंदिर, कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती आणि मृत्युंजयेश्वर ही मंदिरे ३० जून पर्यंत बंदच राहणार असल्याचे श्री देवदेवेश्वर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी रविवारी (ता.७) स्पष्ट केले. 

सोमवारी (ता.८) संकष्टी चतुर्थी आहे. या पार्श्वभूमीवर पंडित म्हणाले, "लॉकडाऊनच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकारने ८ जून पासून मंदिरे खुली होत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्य सरकारने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असल्याने श्री देवदेवेश्वर संस्थानची सारसबाग सिद्धिविनायक मंदिर, कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती आणि मृत्युंजयेश्वर ही मंदिरे ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहेत."

या निर्णयाची दखल घेऊन नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन संस्थान तर्फे करण्यात आले आहे. शासनाच्या पुढील आदेशानुसार जुलै महिन्यात मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येइल, असेही पंडित यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे मंदिरही 30 जूनपर्यंत बंदच राहणार असल्याचे ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक कोंडीपासून दिलासा! महाराष्ट्रातील ३,३२० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजूरी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाहा मार्ग...

T20 World Cup सुरू असताना न्यूझीलंडचा दिग्गज अचानक परतला घरी! दुखापत नाही, तर 'हे' आहे कारण

'सचिन ट्रोल होतो कारण तो...' पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले...'त्याने तरुणपणीच...'

Horoscope : उद्या १६ फेब्रुवारीला 'या' ५ राशींचं भाग्य जोरात! घरी येईल पैसा अन् नोकरीत मिळेल मोठं यश, प्रेमसंबंधांना नवे वळण

Explainer: 'हे' 5 पदार्थ गाढ झोप येण्यास करतील मदत! जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर आजच आहारात करा बदल

SCROLL FOR NEXT