the tempo suddenly took a fire On the Pune-Satara road 
पुणे

पुणे-सातारा रस्त्यावर टेम्पोने अचानक घेतला पेट

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावर वरवे (ता.भोर) येथे साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या टेम्पोने शनिवारी सकाळी अकरा वाजता अचानक पेट घेतला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही मात्र, संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे एक तासभर पुणे-सातारा रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून हेल्मेट आणि पाथपोचा हे साहित्य घेऊन एक टेम्पो साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो वरवे येथे आला असता टेम्पोने अचानक पेट घेतला. 

बाळासाहेबांच्या वेळी राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत पण आता पुण्यात : संजय राऊत

राजगड पोलिसांनी ताबडतोब दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली. काही वेळात अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाला. सुमारे अर्ध्या तासात टेम्पोची आग आटोक्यात आली. त्यानंतर राजगड पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरील टेम्पो बाजूला केला. या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही मात्र संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला.

सुमारे एक तासानंतर पुणे-सातारा रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

दुखःद ! मुलाचा रांजणखळग्यात बुडून मृत्यू, वडिलांचे हृदयविकाराने निधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT