Mohit Lalwani
Mohit Lalwani Sakal
पुणे

पेट केअर आणि ग्रूमिंग करणाऱ्या स्टार्टअपमधून दहा कोटींची उलाढाल

सनील गाडेकर

पुणे - कधीही लक्षात न आलेल्या समस्येवर भन्नाट उपाय शोधून मोठा उद्योग (Business) सुरू केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. अशीच एक भारी कल्पना घेऊन सुरू झालेले स्टार्टअप (Startup) सध्या लाखो रुपयांची उलाढाल (Transaction) करीत आहे. ‘कॅप्टन झॅक’ (Captainzack) असे या स्टार्टअपचे नाव असून पेट केअर (Pet Care) आणि ग्रूमिंगद्वारे त्यांनी वार्षिक १० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. एवढेच नव्हे २०२५ पर्यंत या स्टार्टअपची उलाढाल १०० कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज संस्थापकांनी व्यक्त केला आहे.

हे स्टार्टअप पाळीव प्राण्यांचे केस, त्वचा आणि त्याच्या फुडबाबतचे अनेक उत्पादने तयार करते. विविध प्रकारचे शाम्पू, बाँडी आॅर्इल, संतुलित आहार, टॉवेल, वार्इप्स, पावडर आणि कंगवा यांचा त्यात समावेश आहे. आपल्या उत्पादनांना व्हेटरनरी (पशू वैद्यकीय) परवाना मिळालेले हे देशातील पहिलेच स्टार्टअप आहे. तसेच आपल्या उत्पादनांची संवेदनशील मानवी त्वचेवर वैद्यकीय चाचणी घेणारा हा देशातील पहिला ब्रँड ठरला आहे. स्टार्टअपने ‘वुई लव्ह अॅनिमल्स’ फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे. ती एक हजार ५०० भटक्या प्राण्यांना रोजचे जेवण पुरवते. तसेच त्यांच्या स्वच्छतेसाठीलहान मुलांना शिक्षित करण्याचे कामही करते. संस्थेने १०० भटक्या प्राण्यांना दत्तक घेतले आहे.

म्हणून सुरू केले स्टार्टअप

‘कॅप्टन झॅक’ची स्थापना २०१६ साली झाली. स्टार्टअपचे संस्थापक मोहित ललवाणी यांना त्यांचा श्वान झॅकसाठी बाजारात चांगले शाम्पू आणि कंडिशनर मिळाले नाहीत. त्यांच्यासारख्या इतर श्‍वानप्रेमींची अडचण लक्षात घेऊन त्यांनी पाळीव प्राण्यांच्या त्वचेला खाज न सुटू देणारा, सौम्य आणि पीएच बॅलन्स्ड शाम्पू तयार केला. त्यात आलेल्या यशातून यांनी अशीच समस्या आलेल्या इतर पशू आणि त्यांच्या पालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे स्टार्टअप सुरू केले.

आपल्या पाळीव प्राण्यांची चांगली काळजी घेण्यासाठी त्यांना योग्य उत्पादने मिळावीत, अशी त्याच्या पालनकर्त्यांची इच्छा असते. त्यांची ही अडचण आम्ही आमच्या स्टार्टअपच्या माध्यमातून सोडवली आहे. देशातील पाळीव प्राण्यांच्या फूड मार्केटचे मूल्य २०२० मध्ये दोन हजार ७०७ कोटी रुपयांवर गेले आहे. यातून या क्षेत्रातील संधी स्पष्ट होतात. २०२५ पर्यंत या स्टार्टअपची उलाढाल १०० कोटी रुपयांवर जाण्याचा आमचा अंदाज आहे.

- मोहित ललवाणी, संस्थापक, ‘कॅप्टन झॅक’

काय आहे बाजारपेठेची स्थिती...

  • पाळीव प्राण्याच्या काळजीसाठी पहिल्या वर्षी १० हजार रुपयांपासून एक लाख रुपये खर्च होतो

  • देशातील पेट केअर उत्पादनांची बाजारपेठ २०२० मध्ये २,७०७ कोटी रुपयांवर पोचली २०२१ ते २६ दरम्यान ही बाजारपेठ वार्षिक १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता.

स्टार्टअप विषयी...

  • २०१८ साली स्टार्टअपने प्री-सीरिज ए राउंड फंडिंगमध्ये १.५ दशलक्ष डॉलर्सचा निधी मिळवला

  • येत्या वर्षांत कॅप्टन झॅक तब्बल सात दशलक्ष डॉलर्स फंडिंग मिळवण्यासाठी सज्ज

  • २०२५ पर्यंत कंपनीची उलाढाल १०० कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज

  • आपल्या उत्पादनांना व्हेटरनरी (पशू वैद्यकीय) परवाना मिळालेले पहिलेच स्टार्टअप

  • उत्पादनांची संवेदनशील मानवी त्वचेवर वैद्यकीय चाचणी घेतली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT