Pune News sakal
पुणे

Pune News : बाजार समितीचा संचालकाला दहा गुंठे जागा; बाजार समितीचा अजब कारभार

फळ बाजारात समितीकडून शेतमाल १५ फुटाच्या बाहेर लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. तर अडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध (बापू) भोसले यांना मात्र विशेष सवलत देत दहा गुंठे जागा शेतमाल उतरवून व्यवसायासाठी दिली आहे.

प्रवीण डोके @pravindoke007

पुणे : फळ बाजारात समितीकडून शेतमाल १५ फुटाच्या बाहेर लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. तर अडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध (बापू) भोसले यांना मात्र विशेष सवलत देत दहा गुंठे जागा शेतमाल उतरवून व्यवसायासाठी दिली आहे. त्यामुळे बाजारात सामान्य अडत्यावर अन्याय होत असल्याचा आरोप अडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांनी पत्रकार परिषदेत बाजार समिती प्रशासनावर केला आहे.

फळ भाजीपाला मुख्य गेट नंबर १ च्या उजव्या हाताला ’थेट शेतकरी ते ग्राहक’ विक्रीसाठी अंदाजे दहा ते पंधरा गुंठे जागा राखून ठेवण्यात आलेली आहे. मात्र बाजार समितीच्या संचालकांना शेतमाल विक्रीसाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यायबत बाजारात खमंग चर्चा सुरू आहे. मार्केट यार्डात काही अडत्यांकडे शेतमाल जास्त येतो. त्यामुळे अनेकदा जागे अभावी तो शेतमाल पंधरा फुटांच्या पुढे जातो. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा करत बाजार समिती १८ टक्के जीएसटीसह ५ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई करत आहे.

सध्या राज्यभरात अवकाळी पाऊस येत आहे. पावसामुळे मालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी शेतमाल काढून बाजारात आणत आहे. मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी शेतमाल जास्त झाल्याने कलिंगड आणि चिक्कू उतरवू दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. एका बाजूला बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच शेतमालाचे नुकसान केले असल्याचा देखील आरोप काची यांनी केला.

शेतमाल पंधरा फुटाच्या पुढे गेला की वाहतूक कोंडीच्या नावाखाली दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र बाजारात नवीन नवीन टपऱ्या पडत आहेत. पाकळी एकमध्ये भिंतीच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर डमी आहेत. काही पदाधिकाऱ्यांना विशेष सवलत दिली जाते. त्यांच्यावर कोणती कारवाई बाजार समितीने केली हे सांगायला हवे. सामान्य अडत्यांवर कारवाई होत असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे.

- युवराज काची, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन.

व्यापारी माल असेल तरच बाजार समिती कारवाई करते. शेतमाल असेल तर कारवाई केली जात नाही. बाजार समितीने कोणत्याही संचालकांना विशेष सवलत दिलेली नाही. तसे कोणी केल्यास कारवाई करण्यास बाजार समिती सक्षम आहे. सदर ठिकाणी माल उतरवला जातो आहे. त्याठिकाणी व्यापार केल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आलेले नाही. केलेला आरोप हा चुकीचा आहे़.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

बाजारात अनेक अडत्यांकडे मोठ्या प्रमाणावर कोकणातून आंबा येत आहे. गाळ्यावर जागा नसल्याने आंबा गेटच्या बाहेरच्या बाजूस खाली केला गेला आहे. आम्ही शेतकऱ्यांचा माल विकत आहोत. मार्केट यार्डात येणाऱ्या शेतमालाला जागा उपलब्ध करून देणे बाजार समितीची जबाबदारी आहे. माल जास्त झाल्यास तात्पुरती अनेकांना जागा दिली जाते. केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे.

- अनिरुद्ध (बापू) भोसले, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे., अध्यक्ष, अडते असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT