पुणे

आयटीएफ टेनिस स्पर्धा

CD

उदित, काहीर, अर्जुन, सूरज, मधवीणचा मुख्य फेरीत प्रवेश

पुणे, ता. १२ ः सोलापूर येथे सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना (एसडीएलटीए) आयोजित २५ हजार डॉलर रकमेच्या पुरुष गट टेनिस स्पर्धेत उदित कंबोज, काहीर वारिक अर्जुन राठी, सूरज प्रबोध, मधवीण कामथने आपापल्या प्रतिस्पर्धीना हरवून मुख्य फेरीत प्रवेश मिळविला.
अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना (एआयटीए), महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) मान्यतेने सोलापूर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्ट, जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या मानांकित उदित कंबोजने सोळाव्या मानांकित प्रसाद इंगळेचा ६-२, ३-६, १०-८ असा, चौथ्या मानांकित अर्जुन राठीने तेराव्या मानांकित संदेश कुरळेचा ६-२, ६-१ असा, बाराव्या मानांकित काहीर वारिकने मयंद तिवारीचा ६-२, ६-४ असा, तर बिगर मानांकित सूरज प्रबोधने तिसऱ्या मानांकित आराध्य क्षितिजचा ३-६, ६-३, १०-५ असा पराभव केला.
निकाल :
प्रणव कार्तिक वि.वि. राघव जयसिंघानी ६-१, ४-०; उदित कंबोज वि.वि. प्रसाद इंगळे ६-२, ३-६, १०-८; अर्जुन राठी वि.वि. संदेश कुरळे ६-२, ६-१; आदिल कल्याणपूर वि.वि. कबीर हंस ६-३, ६-७ (२),१०-८; हितेश चौहान वि.वि. व्रज गोहिल ६-०, ६-२; काहीर वारिक वि.वि. मयंद तिवारी ६-२, ६-४; सूरज प्रबोध वि.वि. आराध्य क्षितिज ३-६, ६-३, १०-५; मधवीण कामथ वि.वि. अनिकेथ वेंकटरामन ६-३, ६-४.
------------------

Maharashtra Drought Survey: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ऐंशी टक्के क्षेत्राचे दुष्काळी पंचनामे; तीस हजार ६०८ गावांतील प्रक्रिया पूर्ण

Religious Tourism: प्रयागराजमधील चार प्राचीन शिवमंदिरांचा कायापालट; धार्मिक पर्यटनासाठी पाच कोटींचा निधी मंजूर

Healthcare News : रिम्स रुग्णालयात चार महिन्यांत कार्डिॲक केअर युनिट सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८ खाटांची व्यवस्था

Latest Marathi News Live Update : अभिजीत दीपके दिल्लीला रवाना होणार

Mumbai News: जे. जे. वसतिगृहात २१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांची ९० जणांना लागण

SCROLL FOR NEXT