coep 
पुणे

जंबो कोविड सेंटरमधील तंबू अग्निरोधक 

सकाळवृत्तसेवा

पुणे - जंबो कोविड सेंटरमधील अग्निशामक यंत्रणा अद्ययावत सुविधांनी सज्ज असून, रविवारी रुग्णालयाच्या परिसरात झालेले स्पार्किंग अवघ्या 90 सेकंदांमध्ये नियंत्रित करण्यात यश आले. 

शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी अद्ययावत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णालयाच्या परिसरात प्रशासकीय कार्यालयाच्या बाहेरील कॉम्प्रेसरमधील तापमान वाढले. त्यातील रबरी आवरण वितळू लागल्याने धूर येऊ लागला. जवळच असलेल्या सिलिंडरमधील कार्बनडाय ऑक्‍साइड फवारून धूर नियंत्रणात आणण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर जंबो कोविड सेंटरमधील अग्निशामक यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. त्यातून ही माहिती पुढे आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जंबो रुग्णालयात पुणे महापालिकेची एक अग्निशामक गाडी असून, पुणे महानगर प्रादेश विकास प्राधिकरणाचीही (पीएमआरडीए) प्रशिक्षित मनुष्यबळासह एक गाडी तैनात केली आहे. तसेच, दीपाली डिझाइन एक्‍सिबिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनेही आवश्‍यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे म्हणाले, ""रविवारी झालेले स्पार्किंग अवघ्या एक ते दीड मिनिटांत नियंत्रणात आणले. त्यामुळे येथे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.' 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिकेच्या मुख्य अग्निशामकचे अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, "रुग्णालयातील सर्व तंबू अग्निरोधक आहेत. त्यामुळे हे तंबू पटकन आग पकडणार नाहीत, अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे.' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT