school.jpg 
पुणे

Big breaking : दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्वाची बातमी

मीनाक्षी गुरव

पुणे : तुम्हाला दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे का? मग, जरा इकडे लक्ष द्या. कोरोनाचा वाढता संसर्गामुळे या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीमध्येही अनेक अडचणी येत आहेत. परिणामी यंदा निकाल उशीरा लागण्याची चिन्हे आहेत. बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागेल, असे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरीही दुसरीकडे मात्र विद्यार्थी आणि पालकांना दहावी, बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. या निकालासंदर्भातील सोशल मीडियाद्वारे उलट-सुलट माहिती नागरिकांपर्यंत पोचविली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, शालेय शिक्षण मंत्र्यांनी निकालाबाबत खुलासा केल्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्याथी आणि पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

"साधारणत: दरवर्षी दहावीचा निकाल 10 जूनपर्यंत, तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी लागतो. परंतु यंदा उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होऊन निकाल लावण्यासाठी आणखी किमान दीड ते दोन महिने लागण्याची शक्‍यता आहे.'', असे गायकवाड यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना उत्तरपत्रिका ने-आण करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या शिक्षकांना प्रवासाची परवानगी द्यावी, असे स्थानिक प्रशासन, महापालिका, जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आल्याचेही गायकवाड यांनी नमूद केले.

"लॉकडाऊनमुळे दहावी आणि बारावीच्या निकालाला काहीसा उशिरा होणार आहे. परंतु नागरिकांना सध्या निकालाच्या तारखांबाबत पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये. निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल.'', असे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

*लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणी :
- शिक्षकांपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वेळेत न पोचणे
- तपासलेल्या उत्तरपत्रिका संबंधित नियंत्रकांपर्यंत पोचविण्यात अडचणी
- संबंधित शिक्षकांना प्रवासात अडथळे
-  शेवटच्या पेपरच्या उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत आता पोचत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT