Maharashtra Board Offline Exam News  sakal
पुणे

दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइनच; राज्य मंडळ ठाम

राज्यातील दहावी- बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील दहावी- बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाईन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होईल. बुधवारी (ता.२) राज्य शिक्षण मंडळाची विभागीय मंडळांसमवेत ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत दहावी बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ७५ टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra Board Offline Exam News)

मुंबई, नागपूर, पुणे आदी शहरात ‘परीक्षा पुढे ढकला अन्यथा ऑनलाइन घ्या’, म्हणत विद्यार्थी रस्त्यावर आले होते. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घ्यावी असा एक मतप्रवाह तयार झाला होता. मात्र यावर बोर्डाने ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

गुरुवारी (ता.३) पुण्यातही बोर्डाने दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, या मध्ये परीक्षेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे.

''विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व मार्गदर्शनासाठी शिक्षण विभागातर्फे हेल्पलाइन सुरू केली जाईल. ऑफलाइन परीक्षेला सर्वच विद्यार्थ्यांचा विरोध आहे असे अजिबात नाही. परीक्षेला आणखी वाढीव वेळ देणे यासह अन्य पावले उचलून ऑफलाइन परीक्षा अधिक सुटसुटीत करणे शक्य आहे.''

- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT