Bus Accident
Bus Accident Sakal
पुणे

शिक्रापूरजवळ कार व बसचा भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर - पुणे-नगर महामार्गावर बजरंगवाडी (शिक्रापूर, ता. शिरूर) येथे काल रात्री (ता. १०) सव्वा अकराचे सुमारास कार आणि लक्झरीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यु तर २४ प्रवासी जखमी झाले. दोन्ही वाहानांच्या एकमेकांच्या धडकेनंतर बस एका बाजूला उलटली आणि घसरत एका हॉटेलच्या पार्किंगपर्यंत गेली. त्यामुळे पार्किंगमधील काही कारच्याही नुकसानी झाल्या. दरम्यान हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबतीत शिक्रापूर पोलिस व स्थानिकांनी दिलेली अधिक माहिती अशी, काल रात्री सव्वा अकराचे सुमारास येथील बजरंगवाडी दरम्यान   पुण्याकडे जाणाऱ्या कारची (नंबर एम.एच./12/पी.एन./6728) कारचालक विशाल बबन सासवडे (वय ३४, रा. बजरंगवाडी) नगरकडे जाणाऱ्या लक्झरी बसला ( एम.एच/14/एच.यु./2265) रस्तादुभाजकाच्या पलिकडे जावून जोरदार धडकला. या धडकेने बस घसरून डाव्या बाजूने कलंडली व पुढे घसरत हॉटेल रॉयल पॅलेसच्या पोर्चपर्यंत जावून पोहचली. या दुर्घटनेत कारचालक विशाल बबन सासवडे याचा जागेवरच मृत्यू झाला.  मात्र जोरदार घसरून पडलेल्या बसमुळे २४ जण जखमी झाले.

सदर जखमींची नावे व इतर माहिती पुढीलप्रमाणे, दिपक नरेंद्र अगरवाल (वय 28 वर्शे, रा. अगरवालनगर धुळे), माणिकचंद चिमणलाल जैन, (वय 67 वर्शे, रा. शंकरशेठ रोड, पुणे, हरिषकुमार विजयनंद दुबे (वय 33, रा.दापोडी पुणे), शरयु मनिश जाखेटे (वय 22 रा. देवपुर धुळे ), प्रकाश आप्पासाहेब तुर्मतमक (वय 64, रा. मॉडेल कॉलनी पुणे ) पुजा किसन खैरनार, (वय 29, रा. केशवनगर मुंढवा पुणे), मुकेश वेदप्रकाष सुरवसे (वय 28, रा.म्हाडा कॉलनी औरंगाबाद), शितल दिपक चौघुले (वय 33, रा. धानोरी पुणे), कुशाग्र दिपक चौघुले (वय 8, रा. धानोरी पुणे), नागेष हरिभाऊ शिंगाडे (वय 48, रा.वारजे माळवाडी पुणे ), अशोक पुरूषोत्तम बोरसे (वय 65, रा.धायरी पुणे ), कल्पना अशोक बोरसे (वय 60, रा.धानोरी पुणे), तेहरिम सज्जाद अहमद मोमिन (वय 21, रा. मालेगाव नाशिक), फायझा फरहद षोएब अहमद मोमिन (वय 21, रा. मालेगाव नाशिक), कृतिका मधुकर पाटील (वय 23, रा.देवपुर धुळे), प्रणीत गोकुळ बागुल (वय 34, रा.आंबेगाव बुद्रुक, पुणे), समर्थ मिलींद वैद्य (वय 21, रा.साठेवाडा, एफसी रोड पुणे), रिटा संजय भगत (वय 40, रा. गुरूनानक सोसायटी धुळे), सौम्या संजय भगत (वय 15, रा.गुरूनानक सोसायटी धुळे), संदीप भरत षटकर (वय 35, रा.धायरी, पुणे), नंदीनी राजसाहेब वाघ, (वय 27, रा.विमाननगर पुणे), मोहम्मद युनुस इत्तेखार (वय 24, रा.मालेगाव, नाशिक ). दरम्यान गंभीर जखमी पुढीलप्रमाणे सोमनाथ गोरक्ष शेंडे (वय 32, रा. आडगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), सोमनाथ मधुकर भोसले (वय 46, रा.श्रीगोंदा अहमदनगर), राजा भाईसाहेब सिंग (वय 42 , रा.भोसरी पुणे). दरम्यान या संपूर्ण अपघातास जबाबदार ठरलेल्या मृत विशाल सासवडेवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT