Terrible condition Ramtekdi
Terrible condition Ramtekdi sakal
पुणे

Pune Tekdi : रामटेकडीवर अतिक्रमणांचा डोंगर; चेहरामोहरा बदलला पण बेसुमार वृक्षतोड सुरूच!

योगिराज प्रभुणे

पुणे : बकाल, गचाळ, बजबजपुरी हे शब्द रामटेकडीने आता आठ वर्षांपूर्वीच मागे टाकले. प्रातःविधीसाठी उघड्यावर बसण्याची सवय गेल्या वीस-बावीस वर्षांमध्ये बदलली. ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण’च्या (एसआरए) योजना राबविल्याने रामटेकडीचा चेहरा-मोहरा बदलला; पण, बेसुमार वृक्षतोड आणि टेकडीवरची अतिक्रमणे या दोन्ही आघाड्यांवर ही टेकडी झगडत असल्याचे दिसते.

रामटेकडी आणि त्याचा परिसर म्हणजे पत्र्याची घरे, असे समीकरण होते. पण, आता जवळपास ७० टक्के परिसर बदलला आहे. पूर्वी कचऱ्याचे कंटेनर भरून वहात होते. उघडी गटारे होती, ही स्थिती २००० पर्यंत सर्रास दिसत होती. तिथे असलेल्या खाणी जवळून तेथील लोक जीव मुठीत धरून जात होते. तेथील घरे रामटेकडीवर जात होती. त्यानंतर ‘एसआरए’ची योजना राबविल्याने या परिसर बदलला, अशी माहिती डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

२२ वर्षांपूर्वीची टेकडी कशी होती?

  • या टेकडीवर गर्द झाडी होती.

  • टेकडीवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण होते

  • कचऱ्याचे साम्राज्य होते ,दुर्गंधी होती.

  • उघड्यावरून गटारी वहात होत्या.

  • पत्र्याची घरे. त्या भोवती अस्वच्छता.

  • त्यामुळे पसरणारे साथीचे आजार होते.

  • गुन्हेगारी खूप होती

कुठे आहे रामटेकडी?

वानवडी आणि हडपसर या दोन्ही गावांमध्ये रामटेकडी आहे. त्याच्या जवळच पणेबाबाचा डोंगर आहे. रामटेकडी ही हडपसरच्या बाजूला येते. तर, पणेबाबाचा डोंगर हा वानवडीच्या हद्दीत आहे. पुणे महापालिकेत १९५२ मध्ये वानवडी, हडपसर या भाग आला.

रामटेकडीची परंपरा

रामटेकडीवर उदासीन पंथाची परंपरा आहे. तेथे रामाचे प्राचीन मंदिर आहे. तसेच, इतर देवतांचीही मंदिरे उभारण्यात आली आहे. त्यामुळे या टेकडीला रामटेकडी असे म्हटले जाते. हे नाव नेमकेकधी मिळाले याची नोंद इतिहासात सापडत नाही.

ऐतिहासिक महत्त्व

रामटेकडी परिसरातील सर्व्हेनंबर ४९च्या बाजूला पेशव्यांच्या काळापासून गारपीर आहे. पेशवे आणि इंग्रज यांच्यात लढाई झाली होती. बोटक्लबला मराठ्यांचा सैन्य आणि त्याच्या पुढे इंग्रजांच्या सैन्याचा तळ होता. त्यामुळे रामटेकडी महत्त्व आहे, अशी माहिती माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी दिली.

शुद्ध पाणी पुरवठा

रामटेकडीवर पिण्याचे पाणी आल्याने वानवडी, हडपसर, कोंढवा, मुंढवा, खराडी येथे शुद्ध पाणीपुरवठा करता आला. त्यामुळे या भागात मोठे प्रकल्प साकारले. आता पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केले पाहिजे. त्यासाठी महापालिकेने नियंत्रण असायला हवे, अशी अपेक्षा शिवरकर यांनी व्यक्त केली.

सद्यःस्थिती काय आहे?

टेकडीच्या माथ्यावर मोठी झाडे आहेत. तेथे बेसुमार वृक्षतोड नियमित सुरू असते. टेकडीच्या काही भागावर अतिक्रमण झाल्याच्या खुणा आहेत. या अतिक्रमण वाढण्यापूर्वीच त्यावर कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करतात.

कसा झाला बदल?

या परिसरात ‘एसआरए’ची योजना राबविली. मैलापाणी वाहून देण्याची वाहिनी टाकण्यात आली. टेकडीवर वाढत जाणाऱ्या झोपडपट्ट्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यातून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्यास सुरुवात झाली. हडपसरमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले. रस्ते चांगले झाले. त्यामुळे या भागाचा विकास झाला.

या भागात पन्नास वर्षांपासून राहणारे तात्याबा ठोंबरे म्हणाले, ‘‘येथील लोक पूर्वी उघड्यावर शैचाला बसायचे आता महापालिकेने स्वच्छता गृहे बांधली आहेत. ती स्वच्छ ठेवली जातात. त्यामुळे या भागातील पुढची पिढी उघड्यावर शैलाचा जात नाही.’’ गणपत कोकरे म्हणाले, ‘‘या भाग कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढलेला होता. कचऱ्याचे कंटेनर सगळी दिसत होते. त्यातून दुर्गंधी पसरत होती. आता हा भाग कचऱ्याचा कंटेनरमुक्त झाला आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT