Crime1.jpg 
पुणे

इंद्रायणी घाटावर गुंडांची दहशत; रात्रीच्या काळोखात लुटतायेत नागरिकांना

सकाळवृत्तसेवा

आळंदी (पुणे) : परिसरातील इंद्रायणी घाटावर रात्री गुंडांकडून मारहाण करून नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे. इंद्रायणी घाटावरील विद्युत दिवे बंद असल्याने या ठिकाणी रात्री अंधार असतो. बेरोजगार आणि लॉकडाउनमध्ये अडकलेले दोनशे अडीचशे लोक रात्रीच्या वेळी घाटावर झोपण्यासाठी येतात. परंतु, अंधाराचा गैरफायदा घेऊन काही जण त्यांच्याकडील मोबाईल व पैसे लुटत आहेत.

या गुंडाकडून कोयत्याचाही धाक दाखवला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे परिसरातील भीतीचे वातावरण असून नागरिकांनी रात्रीच्या जेवणानंतर घाटावर फिरण्यासाठी येणे बंद केले आहे. देहूफाटा आणि पद्मावती झोपडपट्टीतील कोयता गॅंगचे गंड परिसरात सक्रिय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देहूफाटा ते चाकण चौक, घाटावरील वैतागेश्वर मंदिर, इंद्रायणीनगर ते साधकाश्रम, भक्त पुंडलिक मंदिर या भागात चोऱ्या करण्यासाठी ही गुंड रात्रीच्या वेळी येत आहेत. यामुळे परिसरातील विद्युत दिवे रात्री सुरू ठेवावे. तसेच पोलिसांनी रात्री गस्त घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 


पोलिस चौकी ओस 
काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी मोठ्या थाटात इंद्रायणी घाटावर चौकी उभारून तिचे उद्घाटन केले. त्यानंतर या चौकीत जेमतेम महिनाभर पोलिस थांबले. मात्र, त्यानंतर ते चौकीकडे फिरकले नाही. परिणामी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे फावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या गुंडाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Project : शक्तिपीठ महामार्ग होणारच, मंत्री उदय सामंतांचे कोल्हापुरात वक्तव्य; सर्वांना विश्वासात घेण्याचे आवाहन

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Latest Marathi News Live Update : थकबाकीमुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा ५ दिवसांपासून बंद

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

SCROLL FOR NEXT