Pune Crime 
पुणे

Pune Crime: पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच; अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते

अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार

धनश्री ओतारी

पुण्यात कोयत्याने हल्ले करण्याचे सत्र सुरुच आहे. आता अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कात्रज भागात ही घटना घडली असून अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते आले कुठून? असा सवाल उपस्थित होत आहे.

कात्रज भागात कोयता घेऊन दहशत माजवून एका तरुणावर वार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विशाल विठ्ठल धुळे (१८) असे गंभीर जखमी झालेल्याचे तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विशाल ने स्वतः पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन मुलांचे वय १५ वर्षे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपी अल्पवयीन मुलांचा विशाल याच्याशी शुल्लक गोष्टीमुळे वाद झाला होता. याच गोष्टीचा राग मनात ठेऊन या मुलांनी विशाल चा काटा काढायचा ठरवले.

विशाल कात्रज भागातील किनारा हाॅटेल परिसरातून जात असताना या तिघांनी येऊन त्याला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि तिथून पळून गेले. जखमी झालेल्या विशालला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

या घटनेवरून पुन्हा एकदा कोयते घेऊन दहशत राहावी करणाऱ्या तरुणांना वचक बसणार कधी हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT