Pune Crime News 
पुणे

Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत! टिळक रोडवर MPSCच्या विद्यार्थ्यावर तिघांचा कोयत्याने हल्ला

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत निर्माण कऱण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वीच एका मुलीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी एका विद्यार्थ्याने आपला जीव धोक्यात घालून तरुणीला वाचवलं होतं. आता पुन्हा एकदा पुण्यात कोयता गँगची दहशत दिसून आली.

पुण्यातील मध्यवर्ती भाग समजला जाणाऱ्या टिळक रोडवर एमपीएससी परीक्षेची तयारी कऱणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसानी पानमळा परिसरातून तिघांना अटक केली. आज पहाटे ही घटना घडली होती.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पुण्यातील कोयता गँगचा मुद्दा विधीमंडळात देखील गाजला होता. त्यानंतर कोयत्याच्या घटनांना ब्रेक लागला होता. मात्र आता पुन्हा कोयता गँग डोक वर काढत असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT