Pune Crime Esakal
पुणे

Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयते आले बाहेर! दहशत निर्माण करण्यासाठी ४ तरुणांचा प्रताप

पुण्यात पोलिसांकडून योग्य ती कारवाई केल्यानंतरही पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत आली समोर

सकाळ डिजिटल टीम

पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत दिसून आली आहे. आम्ही एरिया मधील भाई म्हणत, ४ तरुणांनी कोयते घेऊन परिसरात दहशत माजवल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील उत्तमनगर भागामध्ये ४ जणांनी कोयता घेऊन दहशत माजवली आहे.

तर पुणे पोलिसांनी कोयता गँगची दहशत माजवणाऱ्या ४ जणांना अटक केली आहे. चंद्रकांत सुतार (वय ३०), सूरज गायकवाड (वय २२), राहुल धोडगे (वय २८), अथर्व यनपुरे (वय १९) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ४ ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांची कोणाशी तरी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या ४ ही जणांनी मिळून त्या व्यक्तींचा शोध घेतला. हे चार जण त्या व्यक्तींना शोधत उत्तमनगर भागातील कोंढवे धावडे परिसरात या ठिकाणी आले. या परिसरात येताच त्यांनी त्यांच्या जवळील कोयते काढले आणि दुचाकीवरून परिसरात दहशत माजवली.

"आम्ही या एरिया मधील भाई आहोत, कोणी आमच्यामध्ये आलं तर खल्लास करून टाकू" असे म्हणत त्यांनी नागरिकांवर कोयते उगारले. दरम्यान, त्यांनी या ठिकाणी असलेल्या एका दुकानातील फ्रिजवर पडलेला पेव्हर ब्लॉक मारला. या घटनेमुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. काही वेळ गोंधळ घातल्यानंतर या ४ जणांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन या सगळ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस अधिक तपास करत आहेत

दरम्यान यापूर्वीही पुण्यात काही गुन्हेगारांच्या टोळ्यांनी हातात कोयता घेऊन दहशत निर्माण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केलं आहे. कोयता गँगचा नायनाट करण्यासाठी पोलिसांनी पुण्यात कोयता खरेदी करण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं केलं होतं.

पोलिसांनी याआधी बऱ्याचदा कारवाई करूनही या घटना थांबताना दिसत नाहीत. या घटनांमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT