पुणे

कोल्हापूर:तेरवाड बंधाऱ्याचे दोन पिलर धोक्यात; तातडीच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी

CD

तेरवाड बंधाऱ्याचे दोन पिलर धोक्यात
--
संरक्षक भिंत खचली; पावसाळ्यापूर्वी तातडीच्या दुरुस्तीची मागणी
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
कुरुंदवाड, जि. कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील बंधाऱ्याच्या दोन व तीन क्रमांकाच्या पिलरजवळील संरक्षक भिंत तळातून खचल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

तेरवाड बंधाऱ्याद्वारे परिसरातील अनेक गावांना शेतीसाठी तसेच पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र दोन आणि तीन क्रमांकाच्या पिलरचा तळभाग दुभंगल्याने तसेच पिलरच्या पायाभूत भागाला तडे गेल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात पाण्याचा वेग आणि दाब वाढल्यास बंधाऱ्याच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच शासनाकडून लाखो रुपये खर्चून बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र त्यावेळी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याच्या तक्रारी स्थानिक कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. त्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने आता पुन्हा बंधाऱ्याच्या दुरवस्थेचा प्रश्न समोर आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिंगे यांनी या संदर्भात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आमदार पाटील-यड्रावकर यांनी कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे आदेश दिल्याची माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT