पुणे

चीनमधील वाहन उत्पादक ४० लाख गाड्या परत मागविणार

CD

हाँगकाँग, २२ ऑगस्ट (पीटीआय) : दरवाजांच्या हँडलशी संबंधित सुरक्षेच्या त्रुटींमुळे टेस्लासह चीनमधील वाहन उत्पादकांनी ४० लाखांहून अधिक वाहने परत मागविण्याची (रिकॉल) घोषणा केली आहे. चीनच्या बाजार नियामकाने काल ही माहिती दिली. यंदाच्या वर्षातील हा चीनमधील सर्वांत मोठा वाहन ‘रिकॉल’ असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील वाहन उत्पादक टेस्ला चीनमध्ये निर्मिती केलेल्या तसेच आयात केलेल्या सुमारे २९.८ लाख इलेक्ट्रिक वाहने परत मागविणार आहे. यात ‘मॉडेल ३’, ‘मॉडेल वाय’, ‘मॉडेल एक्स’ आणि ‘मॉडेल एस’चा समावेश आहे. वाहनांच्या दरवाजांच्या हँडलशी संबंधित सुरक्षेतील त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
चिनी माध्यमांनुसार, या वर्षातील ही सर्वांत मोठी ‘रिकॉल’ मोहीम आहे. टेस्ला आणि अनेक चीनमधील अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रीक गाड्यांमध्ये सामान्यतः दिसणाऱ्या मोटारीच्या दारांच्या लपवलेल्या हँडलवर बंदी पुढील वर्षापासून बंदी घालणार असल्याचे अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये जाहीर केले होते. त्यानंतर काही महिन्यांतच गाड्या परत मागविण्याची घोषणा करण्यात आली. चीनच्या नियामकाने दिलेल्या माहितीनुसार, गंभीर अपघातात विद्युत यंत्रणा निकामी झाल्यास वाहनातील व्यक्तींना बाहेर पडण्यासाठी दरवाजा त्वरित उघडता न येणे किंवा बाहेरील बचाव पथकाला वाहनात प्रवेश करता न येणे, असा धोका या हँडलमुळे निर्माण होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT