Testing for the smart signal
Testing for the smart signal 
पुणे

‘स्मार्ट सिग्नल’ची चाचणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘स्मार्ट सिटी’च्या सिग्नल यंत्रणेची चाचणी अवघ्या आठ दिवसांत सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्यावरील पाच चौकांत होणार आहे.

शहरात सुमारे २६४ वाहतूक नियंत्रक दिवे आहेत. एका रस्त्यावरील पाठोपाठचे सिग्नल त्यानुसार नियंत्रित व्हावेत (सिंक्रोनायझेशन), यासाठी महापालिका पाच वर्षांपासून प्रयत्नशील आहे. परंतु त्यात यश आलेले नाही. त्यामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने त्यात लक्ष घातले आहे. त्याअंतर्गत ‘ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (एटीएमएस) कार्यान्वित होणार आहे. 

तांत्रिक मूल्यमापन होणार 
सेनापती बापट रस्ता आणि गणेश खिंड रस्त्यावरील एकूण पाच सिग्नलमध्ये ‘एटीएमएस’ यंत्रणा बसविली जाणार आहे. सुमारे ९ दिवस चाचणी होईल. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आयआयटी मुंबई यांचे पथक त्याचे तांत्रिक मूल्यमापन करून अहवाल सादर करणार आहे.

अशी असेल सिस्टीम 
सर्व सिग्नलचे होणार सिंक्रोनायझेशन
नियम तोडणाऱ्या वाहनांचे क्रमांक नोंदविले जाणार 
कोणत्या वेळी कोणत्या रस्त्यावर किती वाहने, याची माहिती मिळणार 
शहरातील वाहतुकीचे रिअल टाइम चित्र मिळणार 
वाहतुकीबाबतचे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार

कोंडी सोडविण्यासाठी ‘एटीएमएस’ उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चाचणी होणार आहे. त्यासाठी एका अमेरिकन कंपनीचे सहकार्य मिळणार आहे. तांत्रिक मूल्यमापनाच्या आधारावर प्रकल्प राबविला जाईल. 
- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT