Pune  sakal
पुणे

Pune : ठाकरवाडी दिवाळी फराळाचे किट व कपडे वाटप

ठाकरवाडी येथील पन्नास कुटुंबांना हे कीट व कपडे देण्यात आली.

चंद्रकांत घोडेकर

ठाकरवाडी येथील पन्नास कुटुंबांना हे कीट व कपडे देण्यात आली.

घोडेगाव :आंबेगाव तालुक्यातील चासची ठाकरवाडी तसेच डिंभा धरणाच्या परिसरातील बोरघर ,जुन्या आंबेगाव, डिंभा येथील 200 गरजू व गरीब कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी फराळाचे किट व नवीन कपडे देण्यात आली. येथील बहुसंख्य कुटुंबे ठाकर, कातकरी व आदिवासी समाजातील आहेत. येथील सर्व कुटूंबामध्ये आज आनंदाचे वातावरण होते. कारण त्यांना दिवाळीचे फराळ किट आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला कपडे मिळाले होते. इवल्याश्या चिमुकल्यांचीतर आजच दिवाळी साजरी झाली होती.

पुणे येथील साई हेलपिंग हॅन्ड या संस्थेच्या सदस्यांनी त्यांची दिवाळी गोड केली. साई हेलपिंग संस्थेचे सदस्य मनोज सन्याशीव , आयआरबीचे महाव्यवस्थापक रवींद्र वायाळ , नितीन पाटील , गीतांजपी सन्याशीव , सिद्धी संन्याशीव , भावना जैन ,वंदना गाडेकर ,अंतर सैंदाणे हे यावेळी उपस्थित होते. या सर्व सदस्यांनी स्वतः आपल्या हाताने या कुटुंबांना या वस्तू भेट दिल्या.

गेली पाच वर्षे ही संस्था पुणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण आदिवासी भागात सणाच्या दिवशी भेटवस्तू देतात. ठाकरवाडी येथे झालेल्या छोट्याशा कार्यक्रमाचे प्रास्तविक अर्जुन काळे यांनी केले. सुर्त्रसंचालन आशा लोहकरे आणि आभार विनायक राऊत यांनी मानले.

याशिवाय साई हेलपिंग संस्थेने पश्चिम आदिवासी भागातील डिंभा, बोरघर आणि जुने आंबेगाव या गावांमध्ये 150 गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळी फराळकीट आणि 150 पुरुष, स्त्रियांना कपडे आणि मुलांना कपडे वाटले. ठाकरवाडी (ता आंबेगाव) येथे 50 गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे किट व कपडे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT