covid19 Sakal Media
पुणे

रेमडेसिवीर इंजेक्शन न घेता 86 वर्षांच्या आजोबांनी हरविले कोरोनाला

कुटुंबियांनी फुलांच्या पाकळ्या उधळून केले स्वागत.

डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) (ambegaon) येथील शेतकरी भगवान भिमाजी कराळे (वय ८६) हे कोरोनाला हरवून नुकतेच घरी परतले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन (remedesivir injection) न घेता त्यांनी कोरोनावर मात केली. कुटुंबियांनी त्यांचे फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत केले. कोरोना संसर्गामुळे (corona infection) प्रकृती गंभीर झाली होती. ऑक्सिजन पातळी (oxygen level)६५ पर्यंत खाली आली होती. पुणे येथील जंम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कराळे नुकतेच घरी आले आहेत. (the 86-year-old grandfather was cured of corona infection without taking remedesivir injection).

भगवान कारळे यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. कुटुंबियांनी त्यांची कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते कोरोना बाधित आढळून आले. त्यावेळी त्यांचा एचआरसीटी स्कोर १४ होता. मंचरला कोठेही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही. ऑक्सिजन पातळी खालावली होती. सेवानिवृत्त सैनिक मुलगा दत्तात्रय कराळे, नातू प्रसाद कराळे व सून माजी सरपंच सुनीता कराळे यांनी बेडसाठी धावपळ केली. शरद सहकरी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी पुण्याच्या जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये भगवान कराळे यांना दाखल करण्यासाठी मंचरहून ऑक्सिजन सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना नऊ दिवस व्हेंटिलेटर बेडवर ठेऊन ऑक्सिजन देण्यात आला. वेळेवर आरोग्य सुविधा मिळाल्याने व जम्बो कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका यांनी शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे महाभयंकर कोरोना संकटातून माझे वडील बाहेर आले. काळभैरवनाथ मंदिरासमोर गुळ खोबरे शेरणी वाटप केली. आमचे कुटुंब आनंदी झाले आहे.

-दत्तात्रय भगवान कराळे, सेवानिवृत्त सैनिक.

जिद्द व आत्मविश्वास कायम ठेवला. मी या आजारातून बाहेर येणार असा मला ठाम विश्वास होता. मनात इतर अविचारांनी गर्दी होऊ नये म्हणून गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे सतत नामस्मरण करत होतो. रुग्णांनी मनातील भीती दूर केली पाहिजे. आनंदी राहिल्यामुळे हा आजार पळून जाण्यास मदत होते.

-भगवान भिमाजी कारळे, अवसरी खुर्द.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT