baramati sakal media
पुणे

बारामतीत आता प्रशासनच लोकांकडे जाऊन करणार स्वॅब तपासणी

मिलिंद संगई, बारामती

बारामती : कोरोनाचे आक्रमण रोखण्यासाठी आता प्रशासन अँक्शन मोडमध्ये आले असून आता शहर व तालुक्यात गर्दीच्या ठिकाणी स्वॅब तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी दोनशे तपासण्यानंतर एकही रुग्ण सापडला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. बारामती नगर परिषद व पंचायत समिती आरोग्य विभाग यांनी गुरुवारी (ता. 10) संयुक्तपणे शहरातील दुकानातील मालक व कर्मचारी यांची अँटिजेन तपासणी केली. आज केलेल्या शंभर तपासण्यामध्ये एकही कोरोना बाधित आढळला नसल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

दुसरीकडे पोलिसांनीही गर्दीच्या ठिकाणी स्वॅब तपासणी सुरु केली. आज पोलिसांनी केलेल्या शंभर तपासण्यांमध्येही एकही रुग्ण सापडला नाही. लोकांनी तपासणीला येण्याची वाट पाहत न बसता आता प्रशासनाने लोकांच्या दारात जाऊन तपासणीला सुरवात केली आहे. अधिकाधिक तपासण्या करण्याचे निर्देश शासनाकडून आल्यानंतर आता ही तपासणी मोहिम अधिक गतीमान करण्यात आली आहे. दुकानात मालकांसह कर्मचा-यांचेही स्वॅब तपासले जात आहेत.

आज नगरपालिकेच्या वतीने संतोष तोडकर व समाज कल्याण अधिकारी सचिन खोरे यांनी ही मोहिम राबवली. प्रत्येक कामगारासह मालकांचीही करण्याचा प्रयत्न होणार आहे, कोणी कोरोना बाधित आढळले तर त्याच्यावर उप जिल्हा रुग्णालय येथे उपचार होतील. अँटीजेन किट उपलब्ध होतील तशी तपासणी होणार आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे, कोविड सेंटर प्रमुख शाम उपाध्ये, सागर भोसले, किरण साळवे, अनिष मोरे या मोहिमेत सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT