Corona patients File Photo
पुणे

"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचं सरासरी वय ४९ वर्षे"

दुसऱ्या लाटेत भासतेय अधिक ऑक्सिजनची गरज

सकाळ डिजिटल टीम

पुणे : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं सरासरी वय हे ४९ वर्षे असल्याचं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. भारतीय वैद्यक संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) दुसऱ्या लाटेबाबत आलेल्या एका अहवालावर भाष्य करताना ते बोलत होते.

आयसीएमआरनं सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० आणि आत्ताच्या मार्च-एप्रिल महिन्यातील रूग्णांच्या संख्येचा तुलनात्मक अभ्यास केला. या अभ्यासात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचं वय हे पहिल्या लाटेच्या तुलनेत सरासरी ५०.४ वरून कमी होत ४८.९ वर आलं आहे. याला पॉल यांनी पुष्टी दिली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील रुग्णांना श्वसनासंबंधीचा त्रास अधिक जाणवत आहे. पर्यायाने दुसऱ्या लाटेतील रुग्णांना ऑक्सिजनची अधिक गरज भासत आहे, अशी माहिती आयसीएमआरच्या एका अहवालातून पुढे आली आहे.

केंद्र सरकार आयात करणार ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन

ऑक्सिजनची देशातील मागणी आता सर्वोच्च पातळीवर आहे. दिवसाला तब्बल ४ हजार ३०० मेट्रीक टन ऑक्सिजनची सध्या गरज आहे. कोविडच्या आधी ही गरज फक्त ८५० मेट्रीक टन एवढी होती. ऑक्सिजनची देशातील वाढती गरज लक्षात घेता केंद्र सरकारच्यावतीनं ५० हजार मेट्रीक टन ऑक्सिजनची आयात करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह १२ राज्यांमध्ये ऑक्सिजनची गरज जास्त असून, तेथे १७ हजार मेट्रीक टन अधिक पुरवठा करण्यात येणार आहे. व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या सध्या सर्वाधिक असल्याचं निरीक्षण आयसीएमआरनं आपल्या अहवालात नोंदवलं आहे.

ICMR च्या अहवालाचे निष्कर्ष

  1. ऑक्सिजनची गरज असलेले रूग्ण - २७.८ टक्के (पहिली लाट), ५४.५ टक्के (दुसरी लाट)

  2. व्हेंटिलेटरची गरज असलेले रूग्ण - ३७.३ टक्के (पहिली लाट), २७.८ टक्के (दुसरी लाट)

  3. ४० वर्षावरील रूग्णालयात दाखल रूग्ण - ७२.२ टक्के (पहिली लाट), ६९.८ टक्के (दुसरी लाट)

  4. ० ते १९ वयोगटातील रूग्ण (एकूण रूग्णसंख्येपैकी) - ४.२ टक्के (पहिली लाट), ५.८ टक्के (दुसरी लाट)

  5. २० ते ४० वयोगटातील रूग्ण (एकूण रूग्णसंख्येपैकी) - २३.७ टक्के (पहिली लाट), २५.५ टक्के (दुसरी लाट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT