Ashwini Vaishnaw sakal
पुणे

Ashwini Vaishnaw : पुणे स्थानकाची क्षमता वाढविणार;रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,प्रवाशांना टप्प्याटप्प्याने सुविधा

पुणे रेल्वे स्थानकाचा विकास टप्प्याटप्प्याने केला जाईल. त्यामुळे प्रवाशांना अद्ययावत सेवा आणि सुविधा देण्यात येतील, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. विकास करताना स्थानकाच्या ‘हेरिटेज’ दर्जाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. वैष्णव पुणे शहराच्या दौऱ्यावर आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाचा विकास टप्प्याटप्प्याने केला जाईल. त्यामुळे प्रवाशांना अद्ययावत सेवा आणि सुविधा देण्यात येतील, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. विकास करताना स्थानकाच्या ‘हेरिटेज’ दर्जाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. वैष्णव पुणे शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. या वेळी त्यांनी पुणे स्थानकाची पाहणी केली. पुणे शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे या शहराच्या गरजा वाढत आहेत.

त्या दृष्टीने पुणे स्थानकाचा विकास केला जाईल. केवळ पुणे स्थानकाची क्षमता वाढवून चालणार नाही तर जवळच्या स्थानकांचाही विकास होणे गरजेचे आहे. उरुळी स्थानकाजवळ मेगा कोचिंग टर्मिनल केले जाणार आहे. त्याचा फायदा पुण्यातील प्रवाशांना होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पुणे-मुंबई दरम्यान घाट मार्गावरील तीव्र चढण कमी करण्यात येईल. त्यामुळे बँकर जोडण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.

रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या चादरी, उशा आदींच्या (लिनन) स्वच्छतेसाठी पुणे स्थानक प्रशासनाकडून ‘आय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता हे मॉडेल देशात पुणे मॉडेल म्हणून प्रसिद्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या वेळी मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम यादव, पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मार्गिकांबाबत राज्य सरकारशी चर्चा

पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याविषयी वैष्णव म्हणाले, ‘‘या मार्गिका नक्की होतील. त्यांच्या उभारणीत राज्य सरकारचाही वाटा असतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Human Story : भावा हे कोल्हापूर आहे ! महावीर जयंतीनिमीत्त मराठा समाजातील व्यक्तीने जैन समाजाला केली कोट्यावधींची जमीन दान; असा आहे जिव्हाळा

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

SCROLL FOR NEXT