Pune Muncipal Corporation sakal
पुणे

Pune Muncipal Corporation : मुख्यमंत्री कार्यालयाने महापालिकेला फटकारले ; नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष भोवले

शहरातील विविध समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारींकडे लक्षच न दिल्याने पुणे महापालिका प्रशासनाला मुख्यमंत्री कार्यालयाने फटकारले. त्यानंतर अखेर जाग आलेल्या प्रशासनाने मंगळवारी बैठक घेतली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील विविध समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारींकडे लक्षच न दिल्याने पुणे महापालिका प्रशासनाला मुख्यमंत्री कार्यालयाने फटकारले. त्यानंतर अखेर जाग आलेल्या प्रशासनाने मंगळवारी बैठक घेतली. त्यात तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

नागरिकांनी १४१ तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविल्या होत्या. त्यावर तत्काळ कार्यवाहीचे आदेश महापालिकेला देण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्षच झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे पाऊल उचलणे मुख्यमंत्री कार्यालयाला भाग पडले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी यासह विविध विभागांकडील प्रलंबित तक्रारींबाबतची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

मुख्यमंत्री कार्यालयाने पाठविलेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक ४८ तक्रारी बांधकाम विभागाशी, २५ तक्रारी पथ विभागाशी संबंधित आहेत. अन्य तक्रारी सांडपाणी वाहिन्या, पाणी पुरवठा, अतिक्रमण अशा विभागांशी संबंधित आहेत.

पथ विभागाच्या तक्रारी तातडीने सोडविण्यात येतील. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. तक्रारींचे स्वरूप जाणून घेत, त्या तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

- रवींद्र बिनवडे,

अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT