Pune News sakal
पुणे

Pune News : लिपिकाने केला ४५ लाखांचा अपहार

जिल्हा सुरक्षा मंडळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या लिपिकाने साथीदारांशी संगनमत करून ४५ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी लिपिकासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्हा सुरक्षा मंडळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या लिपिकाने साथीदारांशी संगनमत करून ४५ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी लिपिकासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंडळाचे सचिव अजय चोभे (रा. उत्सव होम, भोसरी) यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंत्राटी पद्धतीवर काम करणारा लिपिक अजय शिवाजी ठोंबरे (वय ३०, रा. स्नेहनगर, परळी वैजनाथ, बीड), केशव दत्तू राठोड, विकास चंदर आडे (वय ३३), पवन प्रेमदास पवार (वय २६), मोकाश रतन राठोड (वय २६, तिघे रा. वडगाव शेरी), मिथुन शिवाजी राठोड (वय ३१, रा. दहिफळ, मंठा, जि. जालना), योगेश संभाजी मोडाले आणि लखन देविदास परळीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठोंबरेने साथीदारांशी संगनमत करून आरोपी राठोड, आडे, पवार, राठोड, मोडाले, परळीकर यांना सुरक्षारक्षक असल्याचे भासविले. सुरक्षा मंडळाच्या बँक खात्यातील ४५ लाख ५४ हजार ९१७ रुपयांची रक्कम त्याने साथीदारांच्या खात्यात पाठवून फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT