crime e sakal
पुणे

पुणे : कारागृहातून जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराची निघाली रॅली

वारजे माळवाडी पोलिसांकडून एकास अटक, 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खुनाचा प्रयत्न केल्यामुळे कारागृहात रवानगी झालेल्या व जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराची कर्वेनगर परिसरामध्ये रॅली काढून दहशत पसरविली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी एकास अटक करून 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वैभव उर्फ पप्या उकरे , तुषार जावळकर, सूरज पवार, मयूर पवार, आकाश धोत्रे, मनोज दिघे, अमित नलावडे, विजू मोरे, योगेश पवार, स्वप्नील धोत्रे, सागर धोत्रे, अजय धोत्रे, आशिष माळी, रोहित राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई विष्णू म्हातारमारे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव उकरे विरुद्ध एकाचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयात नेले. त्यावेळी न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली होती. दरम्यान, आरोपीला जामीन मंजुर झाल्यामुळे तो शुक्रवारी कारागृहाबाहेर पडला.

त्यानंतर तो कर्वेनगरमधील वडार वस्ती परिसरात आला. त्याच्या साथीदारांनी नागरीकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी दुचाकी रॅली काढली. त्यावेळी त्यांच्याकडे तलवारी, गज, काठ्या होत्या. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी उकरे व त्याच्या साथीदारांना समज देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांना या प्रकरणात न पडण्यास सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जे. एन. होळकर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena–AIMIM Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिनसेनेची देखील AIMIM सोबत युती

बंडखोरी भोवली! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानंतर मालेगावात भाजपकडून दोन माजी महापौरांची पक्षातून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : पुणे भाजप माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेंनी अजित पवारांची भेट घेतलीय

लोकशाहीची सुरवात पाश्चात्य देशात नाही तर भारतातील 'या' राज्यात झाली! CM योगी आदित्यनाथांनी दिले पुराव्यांसह उत्तर

Farmer Success Story: अंकितची केळी गेली साता समुद्रापार; युवा शेतकऱ्याच्या श्रमाला मिळाल फळ, अडीच एकरात लाखांचे उत्पन्न..

SCROLL FOR NEXT